खरीप हंगात आणि रब्बी हंगामात शेतकरी वर्गाचे वेगवेगळ्या कारणामुळे खूप नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अचानक पडलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.बदलत्या हवामानाचा सर्वात मोठा परिणाम हा पिकांवर आणि फळबाग यावर होत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे पिकावर अनेक प्रकारचे रोग पडत आहेत. तसेच याचा परिणाम उत्पन्नांवर होताना आपल्याला दिसून येत आहे.वातावरणात बदल झाल्यामुळे आणि अचानक पडलेल्या पावसामुळे द्राक्षांच्या घडात पाणी साचले आहे. आणि द्राक्ष ला तडे गेले आहेत. त्यामुळं शेतकरी वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
द्राक्ष बागेत मोकळ्या कॅनोपी ची गरजेची:-
पावसामुळे बागेतील आर्दता वाढली आहे त्यामुळं काडीवर कॅनॉपीही जास्त प्रमाणात तयार केले आहेत. पाऊस आणखी काही दिवस राहीला तर घड कुजण्याची भीती शेतकरी वर्गाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर द्राक्षेची छाटणी करून घ्यावी. द्राक्ष बागांमध्ये सध्याच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे.या पासून वाचण्यासाठी बागेत मोकळी कॅनोपी असणे खूप गरजेचे आणि आवश्यक आहे. सर्वसामान्य आणि दाट कॅनॉपीमधे रोगकारक घटकांची वेगाने वाढ होते व त्याचा प्रसार घडापर्यंत होतो. हे टाळणासाठी प्रत्येक काडी सुटसुटीत राहील याकडे महत्वपूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे.
व्यवस्थापन:-
द्राक्ष बागेमध्ये काड्या ह्या तारेवर बांधाव्यात. काडीवर निघालेल्या बगलफुटीसुद्धा काढून टाक्यावात तसेच त्याचबरोबर काडीच्या तळातील 3 ते 4 पाने काढून टाकावी आणि दोन फांद्या मध्ये योग्य अंतर ठेवावे. त्यामध्ये वेलित हवा खेळती राहते. त्यामुळं बाग वेगवेगळ्या रोगांपासून बचावते. यासोबतच पानाच्या पृष्ठभागावर बुरशीनाशक, धूळ किंवा स्टिकरचा लेप तयार होऊ देऊ नये. शिवाय द्राक्षाची पाने निरोगी व रोगमुक्त ठेवावी लागणार आहेत. याची प्रामुख्याने काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
द्राक्षाचा भुरी रोगापासून प्रादुर्भाव कसा रोखावा:-
द्राक्ष।फळछाटणी नंतर 40 दिवसांच्या काळामध्ये बागांमध्ये ट्रायअझोल गटातील हेक्साकोनॅझोल किंवा डायफेनोकोनॅझोल 1 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे बागेवर फवारणी करावी. फळ छाटणीनंतर 30 ते 35 दिवसांच्या अवस्थेतील बागांमध्ये जयमेथोमॉर्फ किंवा मॅडीप्रोपेमाइड 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बागेत फवारणी करावी. तर केवडा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी द्राक्ष बागेत अमिसलब्रोम 150 मिलि पाण्यात मिसळून प्रति एकर याप्रमाणे फवरावे
Share your comments