गवार हे उष्ण हवामानातील पीक असून सरासरी 18 ते 30 अंश सेल्सिअस तापमानास हे पीक उत्तम येते.गवारीची लागवड खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात केली जाते. उन्हाळी पीक शेंग भाजी साठी घेतात. दक्षिण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे,
अशा ठिकाणी गवार बी उत्पादनात भरपूर वाव आहे. गवारीच्या शेंगा मध्ये फॉस्फरस,चुना,लोह इत्यादी खनिजा आणि अ ब क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे आहारात एक महत्वाचे भाजीपाला आहे. या लेखात आपण गवार पिकाचे काही सुधारित वानांची माहिती घेणार आहोत.
गवार चे काही सुधारित वाण
- पुसा सदाबहार- ही सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केलेले आहे. या जातीच्या शेंगा 12 ते 15 सेंटिमीटर लांब असून, शेंगा हिरव्या रंगाच्या असतात.शेंगांचे काढली 45 ते 55 दिवसांनी सुरू होते.
- पुसा नव बहार-ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते. शेंगा 15 सेंटिमीटर लांब,कोवळ्या हिरव्या रंगाच्या असतात.झाडांची सरळ वाढ होते. पानाच्या बेचक्यात शेंगांचा घोस असतो.
- सुरती गवार-झाडाच्या फांद्या अधिक असतात.ऑक्टोबर नंतर व उन्हाळ्यात घेतली जात असूनशहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी असते.शेंगा जास्त पातळ,लांबव जाडसर असून अधिक गुळचट व उभी लव असते.गुच्छ लागत नाही.
- देशी (गावरान) गवार- पुसा जातीचे शोध लागणे अगोदर 40 वर्षांपूर्वी गाव गाव देशी गवारीचे बीप्रसिद्ध होते.ही गवार आखूड, निबर, बी युक्त,केसाळ व अंगाला लागल्यावर खाज होणारी परंतु चविष्ट असून खेडेगावांमध्ये चवीने खाल्ली जाते.
- नंदिनी( एन सी बी 12 )- ही संकरित जात असून निर्मल सीड कंपनीची गावरान गवारी सारखीच आहे. याच्या शेंगा आखूड व कोवळ्या, मऊ असतात.विशेषता याची चव चांगली असल्याने याला बाजारात चांगलीच मागणी असते.
- झाड लहान असल्यापासून पानाच्या बेचक्यात भरपूर शेंगा येतात.ही जात रोग प्रतिकारक्षम असल्याने व्यापारी लागवडीसाठी फायद्याची ठरते.
सुधारित वाण
महाराष्ट्रात देशी, सोटीया व विदेशी असे तीन प्रकार मानण्यात येतात.विदेशी प्रकार शेंगा न करिता, सोटिया हिरवळीच्या खतासाठी व शेंगा साठी आणि देशी मुख्यत्वे बी यासाठी कोरडवाहू पीक म्हणून लावतात.
Share your comments