1. कृषीपीडिया

सोयाबीन बीजोत्पादन: सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान

मागच्या वर्षी सोयाबीन बियाण्याचे समस्या निर्माण होऊन ठिकाणी सोयाबीन उगवन झाली नव्हती.तसेच मागील दोन ते तीन वर्षापासून खरीप हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर येणारा हंगाम हा सोयाबीन साठी यशस्वी व्हावा याकरिता उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत देण्यात आली. याबाबत या लेखात माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soyabioen

soyabioen

मागच्या वर्षी सोयाबीन बियाण्याचे समस्या निर्माण होऊन ठिकाणी सोयाबीन उगवन झाली नव्हती.तसेच मागील दोन ते तीन वर्षापासून खरीप हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर येणारा हंगाम हा सोयाबीन साठी यशस्वी व्हावा याकरिता उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत देण्यात आली.  याबाबत या लेखात माहिती घेऊ.

 सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान

  • पाणी- सोयाबीन लागवडीनंतर पाच दिवसांनी पुन्हा तुषार सिंचन आणि हलके पाणी द्यावे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने तसेच मार्च एप्रिल महिन्यात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने नियमितपणे पाणी द्यावे. सोयाबीनचे रोप आवस्था, फुलोरा अवस्था व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या संवेदनशील अवस्था असल्यामुळे या काळात पाटाने पाणी द्यावे.पाणी देताना ते साचणार नाही याची काळजी घ्यावी. पीक पेरणीपासून ते काढणे या कालावधीमध्ये जमिनीचा पोत यानुसार आठ ते दहा पाणीपाळ्यांचीआवश्यकता आहे.
  • भेसळ काढणे- सोयाबीन पिकामध्ये पानांचा आकार, झाडावरील लव, झाडाची उंची, पान, खोडवा फुलांचा रंग इत्यादी लक्षणानुसार भेसळ ओळखून पीक फुलोरा अवस्थेत असताना व काढणीच्या वेळेस भेसळ ओळखून भेसळ झालेले घटक काढावेत एका प्लॉटमध्ये सोयाबीनच्या दोन वानांचे बीजोत्पादन घेतले तर दोन वानांमध्ये पाच मीटर चे विलगीकरण अंतर ठेवावे.
  • पीकसंरक्षण- कीड- उन्हाळी सोयाबीन पिकावर पाने पोखरणारी आळी, वाटाणा वरील शेंगा पोखरणारी अळी, खोडमाशी, घाटे अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. या किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50 टक्के ईसी ( 20 मिली ),लॅम्बडासायक्लाथ्रिन4.90 सी एस ( 6 मिली इमामेक्टीन बेंजोएट 1.90 टक्के ईसी (8.50 मिली ),इंडाक्साकार्ब15.80 टक्के इसि ( सात मिली ), फ्लूबेडियामाईंड39.35 एम एम एस सी ( तीन मिली ) इत्यादी कीटकनाशकांचा वापर करावा
  • रोग- उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. परंतु तरीदेखील येल्लो व्हॅन मोजक्या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास उपटून नष्ट करावीत. पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पांढरी माशीचे नियंत्रण करणे आवश्यक असते. त्यासाठी पायमिथोक्साम 12.60 टक्के, लॅम्बडासायक्लॉथरीन 9.50 टक्के झेड सी ( अडीच मिलि ) किंवा बीटामायफ्लूथरीन8.49 टक्के+ इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकांचा वापर करावा. कीटकनाशकांचे प्रमाण हे दहा लिटर पाण्यासाठी असून साध्या पंपासाठी आहे.
  • काढणी व मळणी- शेंगा पिवळ्या पाडून पक्व होतात पिकाची काढणी करावी. सोयाबीनच्या कापणीनंतर पिकाचे छोटे-छोटे डी करून दोन ते तीन दिवस उन्हात चांगले वाळू द्यावी त्यानंतर मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावयाच्या बाह्य आवरणाला इजा पोहोचणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता 14 टक्के असेल तर मळणी  यंत्राच्या फेऱ्यांची  गती 400 ते 500 फेरे प्रति मिनिट इतके ठेवावी. वानातील आद्रतेचे प्रमाण 13 टक्के पर्यंत  असेल तर गत 300 ते 400 फेरे प्रति मिनिट इतकी ठेवावी.
  • साठवण- मळणी यंत्र बियाणे ताडपत्री / सिमेंटच्या बळावर पातळ पसरून आद्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्के बियाणे स्वच्छ करून पोत्यात भरून साठवण करावी. साठवणूक करण्याचे ठिकाण थंड, ओलावा विरहीत व हवेशीर असले पाहिजे. एकावर एक 4 पेक्षा जास्त पोती ठेवू नये.
  • उत्पादन- उन्हाळी सोयाबीनचे एकरी तीन ते पाच क्विंटल  पर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते.

(संदर्भ- हॅलो कृषी )

English Summary: the technique of soyabioen seed production and benifit of soyabioen crop Published on: 07 December 2021, 10:57 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters