शेतीमध्ये पिकांना रासायनिक खताची गरज असते. त्यांना लागणारे विविध प्रकारचे पोषण द्रव्यांचा पुरवठा हा खतांच्या मार्फत होत असतो. त्यामुळे पीक उत्पादन वाढीस मदत होते व शेतकऱ्यांना चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते. परंतु खते देताना त्यांचा देण्याचा कालावधी, योग्य निवड व इतर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेणेकरून खतापासून मिळणारा फायदा पिकांना चांगला होतो. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.
खतांची योग्य निवड
1- खतांचे नियोजन करायचे तर अगोदर माती परीक्षण केले तर खूप महत्त्वाचे असते. म्हणजे आपल्याला कळते की कुठल्या अन्नद्रव्यांची कमतरता असेल व कोणते खत द्यावे लागेल, याचा नेमका अंदाज येतो.
2- नत्राचा पुरवठा करतो त्यासाठी नीम कॉटेड युरीयाचा वापर करावा.
3- जर मातीमध्ये स्फुरद कमतरता असेल तरच स्फुरदयुक्त खतांचा वापर महत्त्वाचा ठरतो.
4- काही पिके कमी कालावधीची तर काही जास्त कालावधीचे असतात. त्यामुळे कमी कालावधीत या पिकांना त्वरित अन्नद्रव्य उपलब्ध होणारी खते आणि जास्त कालावधीच्या पिकांसाठी हळूहळू अन्नद्रव्य उपलब्ध होतील अशा खतांचा वापर करावा.
5- पिके जास्त कालावधीचे असतील तर साइट्रेट विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फास्फेटिक खताचा वापर करावा.
6- खतांचे नियोजन करताना चालू पिक आधी अगोदर कुठले पीक घेतले होते त्याला कोणत्या खताचा जास्त वापर केला होता, याचा विचार करणे गरजेचे आहे.
7- जमिनीत ओलसरपणा कमी असेल तर अशा जमिनीत नायट्रेट युक्त किंवा सिंचनाची सुविधा किंवा जास्त पावसाच्या भागात अमोनीकल किंवा अमाइडयुक्त नायट्रोजन खतांचा वापर करावा. ओलसर भागात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना कॅल्शियम तसेच मॅग्नेशिअम इतर खतांचा वापर करावा. कारण अशा भागात मातीत कॅल्शियम मॅग्नेशियम कमतरता असते.
नक्की वाचा:चुकून तणनाशक फवारले गेले तर काळजी करू नका करा फक्त हे सोप्पे उपाय
8- आम्लयुक्त जमिनीत क्षार प्रभाव कमी करणाऱ्या नायट्रोजन युक्त खतांचा वापर करणे किंवा फॉस्फरसचा पुरवठ्यासाठी फोस्पेटिक युक्त मिश्रणाचा वापर करणे आवश्यक आहे. वालुकामय जमिनीत जैविक खतांचा अधिकाधिक वापर करावा जेणेकरून अन्नद्रव्यांचे पोषण होऊन कमीत कमी प्रमाणात नुकसान होते व त्याचप्रमाणे चिकन मातीच्या जमिनीत देखील जैविक खतांचा वापर करणे गरजेचे आहे.
खतांचा वापर कधी व कसा करावा?
1- पेरणी करणे अगोदर शेतात शेणखत व कंपोस्ट खत द्यायचे असेल तर व्यवस्थित पेरणीपूर्वी मातीत मिसळून द्यावे.
2- फोस्फेटिक आणि पोटॅशियम युक्त खताची पूर्ण मात्रा पिक पेरणीच्या वेळी शेतात चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळून द्यावे.
हे खते पेरणीच्यावेळी शेतात तीन ते चार सेंटीमीटर खाली आणि तीन ते चार सेंटीमीटर बाजूला दिले पाहिजे. तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त या खताना नेहमी पिकाच्या मुळ्याजवळ द्यावे.
3- खतांना मिश्रणाच्या स्वरूपात उभ्या पिकात फवारणी केल्यास नायट्रोजन वायूविजन, स्थिरीकरण, डीनायट्रीफिकेशन द्वारे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवले जाऊ शकते.
Share your comments