जर आपणही शेतकरी असाल आणि कमी वेळेत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या लागवड करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही आपल्यासाठी एका विशिष्ट पिकाची लागवड पद्धतची माहिती घेऊन आलो आहोत. आम्ही ज्या पिकाविषयी बोलत आहोत ते पीक आहे सुर्यफुलाचे. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सूर्यफूल लागवडीविषयी ए टू झेड माहिती. सूर्यफुलाची शेती एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे, एक असे पीक आहे जे दुष्काळी भागात देखील घेता येऊ शकते. या पिकावर दुष्काळाचा व तापमानाचा कुठलाही फरक पडत नाही. खरे पाहता सूर्यफूल एक रब्बी हंगामातील पीक. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे कमी कालावधीत काढणीसाठी तयार होते, तसेच या पिकातून अधिक उत्पादन देखील प्राप्त करता येते. याच वैशिष्ट्यामुळे याची शेती भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते.
सूर्यफुलाच्या शेती विषयी काही महत्वपूर्ण बाबी
सूर्यफूल लागवडीचा हंगाम- सूर्यफूल एक रब्बी हंगामातील पीक आहे. याची लागवड ही मुख्यतः नोव्हेंबर महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत केली जाते. तसे बघायला गेले तर सूर्यफूल एक नगदी पीक आहे, तसेच हे एक प्रमुख तेलबियांचे पीक आहे. महाराष्ट्रातील याची लागवड लक्षणीय आहे व शेतकरी बांधव या पिकातून चांगले उत्पन्न प्राप्त करत आहेत.
सूर्यफूल लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत- सूर्यफूल पिकासाठी जमिनीची पूर्वमशागत अत्यावश्यक आहे. लागवड करतांना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करण्यात यावी, तसेच जमीन ही चांगली नागरून भुसभुशीत केलेली असावी. जमिनीची पूर्वमशागत जर योग्य रित्या केलेली असेल तर यातून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. जमिनीची सर्वात आधी नांगरणी करून घ्यावी मग याची लागवड करावी.
सूर्यफुलाची पेरणी कशी करावी- पेरणी करण्याआधी सूर्यफुलाची बियाणे हे पाण्यात भिजवून घ्यावे, बियाणे हे कमीत कमी सहा तास पाण्यात भिजवावे. सेक्स केल्याने बियाणे लवकर उगवतात. शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा कि बियाणे भिजवल्यानंतर सावलीत चांगले सुकवून घ्यावे. तसेच जर बियाण्यावर बीजप्रक्रिया केलीतर उत्पादन कमालीचे वाढते.
सूर्यफूल पिकासाठी पाणी व्यवस्थापन
सूर्यफूल पिकाला पहिले पाणी हे पेरणी केल्याच्या वीस ते पंचवीस दिवसानंतर द्यावे, तसेच या पिकाला दुसरे पाणी हे फुलोरा अवस्थेत असताना द्यावे. त्यानंतर दर पंधरा दिवसांनी या पिकाला पाणी देण्याचा सल्ला दिला जातो. एकरी बियाणे ते चार किलो पर्यंत लागू शकते, संकरित बियाणे एकरी दोन किलोच लागते.
सूर्यफूल पिकाची काढणी- पिकाची सर्व पाने सुकल्यानंतर व फुलाचा मागचा भाग पिवळा पडल्यानंतर या पिकाची काढणी सुरू होते. काढून तुला उशीर केल्यास या पिकावर उदही लागू शकते, आणि उत्पादनात मोठी घट घडून येऊ शकते. त्यामुळे सूर्यफुलाची वेळेवर काढणी करणे अत्यावश्यक आहे.
Share your comments