सोयाबीनची लागवड महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये केली जाते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख दोन पिके आहेत. परंतु जर आपण कापसाचा विचार केला तर गुलाबी बोंडअळी मुळे कापूस उत्पादक शेतकरी खूप जास्त प्रमाणात त्रस्त आहेत.
तर सोयाबीन वर देखील विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. जर आपण सोयाबीन पिकाचा विचार केला तर प्रत्येक हंगामात सोयाबीनवर न दिसणारी परंतु दर दहा वर्षांच्या कालावधीत प्रत्येक तीन वर्षांनी शंख गोगलगायीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात होतो.
शंख गोगलगायी मुळे देखील सोयाबीन पिकाचे खूप मोठे नुकसान होते. या वर्षी जर विचार केला तर अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करण्यात आलेल्या सोयाबीन ची अवस्था शंख गोगलगायी मुळे खूप धोकादायक झाली आहे. यात बीड जिल्ह्यातील केज, धारूर तालुक्यासह परळी तालुक्यात देखील खूप मोठे नुकसान त्यामुळे होत आहे.
नक्की वाचा:बापरे! सावधान सोयाबीन पिकावर सर्वत्र येत आहे हा रोग!
या शंका गोगलगाई सोयाबीनची पाने कुरतडत असल्यामुळे सोयाबीनची वाढ खुंटत आहे. शंख व अन्य गोगलगायी सोयाबीनचे रोपे खाऊन नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.
बीड जिल्हा कृषी विभागाने देखील यांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. परंतु तरी देखील बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया गेला आहे.
या पार्श्वभूमीवर सोयाबीन सह इतर पिकांना देखील शंख गोगलगायींचा प्रादुर्भावाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला असून याविषयी कृषी व महसूल यंत्रणेने तात्काळ पंचनामे करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
नक्की वाचा:गुलाबी बोंड अळी का येते? (आता कोणत्या चुका टाळाव्यात?)
शंख गोगलगायीचा प्रादुर्भाव कशामुळे होतो?
पावसाळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी प्रामुख्याने शंख गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. ओलावा, हवेतील आद्रता ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आहे. असे वातावरण शंख गोगलगाईंसाठी पोषक असल्याने अशा ठिकाणी हे जास्त प्रमाणात आढळतात.
सोयाबीन पिकावर जेव्हा यांचा प्रादुर्भाव होतो तेव्हा गोगलगायींच्या लाळेमुळे सोयाबीनची पाने खूप मोठ्या प्रमाणात खराब होतात. तसेच सोयाबीनची शेंडे,
पाने मोठ्या प्रमाणात कुरतडून खात असल्याने अगदी प्राथमिक अवस्थेत अस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन झाडांची वाढ कमी होते. दर तीन वर्षांनी सामान्यपणे विचार केला तर यांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे गोगलगाईच्या दरवर्षी येणारे अवस्थेवर खूप काम करणे गरजेचे आहे.
Share your comments