प्रत्येक शेतकरी पिकाची लागवड करत असताना आपण लागवड केलेले पिकाचे उत्पादन भरघोस यावे यासाठी विविध प्रकारचे व्यवस्थापन करतात. अशा प्रकारचे व्यवस्थापन करत असताना रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जमीन तयार करण्यापासून तर पिकांच्या काढणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन खूप गरजेचे असते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीची पूर्वमशागत हा होय
सॉईल सोलारायझशन म्हणजे जेव्हा आपण जमीन नांगरतो तेव्हा जमीन नांगरून चांगल्या पद्धतीने तापू देणे होय. यामुळे शेतकरी बंधूंना पुढील पीक उत्पादनात खूप मोठा फायदा मिळतो. या लेखातील याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Groundnut Tips: भुईमुगाचे भरघोस उत्पादन हवे तर करा प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर,होईल फायदा
सॉईल सॉलरायझशनचे फायदे
उन्हाळ्यामध्ये आपण जमिनीची नांगरणी करतो. नांगरणी करताना ट्रॅक्टर किंवा बैलचलित नांगराच्या साह्याने एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते व उन्हाळ्यामध्ये 35 अंश सेल्सिअस पेक्षा जेव्हा अधिक तापमान असते
त्यावेळी 15 सेंटिमीटर खोलीपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीमध्ये ज्या काही हानिकारक बुरशी असतात त्या नष्ट होतात. एवढेच नाही तर ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्यादेखील यामुळे नष्ट होतात. एवढेच नाही तर जमीन तापल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण जवळजवळ सहा पट वाढते.
तसेच जमिनीची एलेक्ट्रिकल कण्डक्टिविटी वाढते. तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशियम व पोटॅश सारख्या घटकांची घनता देखील वाढते व जमिनीची उत्पादकता वाढण्यास आपसूकच मदत होते. वनस्पती व प्राण्यांचे प्रमाणे जमिनीला सुद्धा सूर्यप्रकाशाची गरज आहे. पिकांच्या मुळांची वाढ होण्यासाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे.
जमीन जर कडक असेल तर पडणारा पाऊस पटकन वाहून जातो व पावसाचा ओलावा खोलपर्यंत जात नाही. परंतु जमीन खोलवर नांगरट केली असेल तर पाणी खोलवर मुरते व जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होतो
व सहाजिकच त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो.तसेच जमिनीतील ओलसरपणामुळे आवश्यक सेंद्रिय पदार्थांचे विघटन पटकन होते व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना लवकरात लवकर उपलब्ध होतात.
Share your comments