हे समजून घेता येईल. मित्रांनो आपल्या शरीर आरोग्या प्रमाणेच जमिनिचे आरोग्य महत्वाचे आहे. आपले आरोग्य बिघडले की लगेच आपण डॉक्टरकडे जातो. तसेच जमिनीचेही तेच आहे. तिचे आरोग्य बिघडले तर ति कोठे जाणार ? जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा नादात आपन जमिनीच्या आरोग्य कडे लक्षच देत नाही. एक पीक काढले की लगेच दुसरे पीक काढायची जनुकाही स्पर्धा घेतआहे पुन्हा त्यात भर म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर, यामुळे आपली जमिनीचा पोत बिघडत चालला आहे.
भविष्यात आपल्याला उत्पन्न मिळेल मात्र यात शेतीचे अतोनात नुकसान होईल हे शाश्वत सत्य आहे.
आपन बिघडवलेल वातावरण, कमी जास्त पाऊस तसेच रसायनाचा वापर यामुळे मातीचेआरोग्य बिघडले आहे. पुन्हा मी हात जोडून विनंती करतो जमिनीचे मातीपरीक्षण करा व शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत रहा आपन जर असे केल्यास आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येईल.जसे की माती परीक्षणा साठी आमचे कृषी विज्ञान केंद्र घातखेड कटीबद्ध आहे माती परीक्षणाची मोहीम सुरु केली आहे.
शेतक-यांनी माती नमुन्याची तपासणी केली जाते. क्षारता, आॅरगॅनीक आर्यन, नत्र, पालाश, स्फुरद, तांबे, लोह, जस्त, मॅगनीज, बोरान, मातीच्या अशा विविध घटकांची तपासणी करतात.आपल्या जमिनीचा पोत सुधारायला हवा असे मला वाटते. माझे हेच एक मिशन आहे माती बद्दल जनजागृती करणे व सुपीकता कमी होण्याची कारण समजावून घेणे एकापाठोपाठ एकच पीक घेत राहतो, सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा समतोल वापर थांबविणे गरजेचे आहे, शेणखताचा वापर नसणे या कारणामुळे आपल्या जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे.
अजुन वेळ गेलेली नाही जमिनीच्या सुपीकेतेसाठी प्रत्येक शेतक-याने आपल्या शेतातील मातीचेपरीक्षण हे करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मातीपरीक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त होईल..... धन्यवाद
आपला मित्र मिलिंद जि गोदे
Share your comments