तीळ लागवडीसाठी खरीप हंगाम हा योग्य मानला जातो. तीळ पिकासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे त्याची लागवडही पडीत जमिनीत केली जाऊ शकते.तीळ मध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असल्यामुळे ते शरीरातून कोलेस्टेरॉल कमी करते
त्यामुळे महाराष्ट्रात आणि जवळ जवळ भारतात तिळीची मागणी चांगली आहे. जर मागच्या वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रात खरीप हंगामात तीळ पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र हे जवळपास 52 हजार 600 हेक्टर होते. त्या एकूण क्षेत्रामधून जवळपास 18 हजार 900 टनतिळीचे उत्पादन मिळाले. तीळ हे पिक पीक फेरपालट आला सुद्धा चांगले आहे तसेच दुहेरी पीक पद्धती साठी सुद्धा योग्य आहे. कारण ते 80 ते 85 दिवसांत काढणीस येते. तीळ पिकाची लागवड ही तुर, मका आणि ज्वारी मध्ये आंतरपीक किंवा सh पीक म्हणून करता येते. या लेखात आपण लागवडीविषयी माहिती घेऊ.
तीळ लागवड- महत्त्वाची माहिती
- लागणारी जमीन- या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते.जमीन मध्यम ते भारी असेल तर खूप फायदेशीर ठरते. तीळ लागवड करण्याअगोदर जमीन दोन ते तीन वेळा चांगले नांगरून घ्यावे. त्यामुळे पिकाचे उगवण क्षमता चांगली होऊन त्यांची वाढ चांगली होते व उत्पन्न चांगले मिळते.
- पेरणीचा योग्य हंगाम- शेतकऱ्यांनी जर जुलै महिन्यामध्ये तिळाची पेरणी केली तर फायदेशीर ठरते. रेताड आणि चिकन माती असलेल्या जमिनीत पुरेसा ओलावा जर असला तर हे पीक खूप चांगले येते. तेलबिया पिकांच्या लागवडी मध्ये पाण्याची गरज कमी असते.
- तीळ पिकाची कापणी कधी करावी?- जेव्हा तीळ पिकाची 75% पाने आणि देठ पिवळे होतात, त्यावेळी ते काढण्यासाठी योग्य आहे असे समजावे. म्हणजे पेरणीपासून जवळपास 80 ते 95 दिवसांनी ती पूर्ण विकसित होते आणि काढनिला तयार बनते. जर तुम्ही लवकर काढणी केली तर ती तिळच्या बिया बारीक राहतात आणि सहाजिकच बारीक राहिल्यामुळे उत्पादन खूपच कमी होते. त्यामुळे तिळीची कापणी ही अगदी वेळेवर करायची असते.तीळ पिकापासून साधारणपणे सहा ते सात क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.
Share your comments