साग हा वृक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर उपयोगी पडणाऱ्या लाकडांच्या प्रकारांचा विचार केला तर यामध्ये सागाचे लाकूड खूप महत्त्वपूर्ण असून जास्त महाग विकले जाते. विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांमध्ये सागाच्या लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो व त्यामुळे त्याला चांगला बाजारात दर देखील मिळतो.
जर शेतकरी बंधूंनी एका एकर क्षेत्रामध्ये देखील सागवान लागवड केली तरी कमीत कमी गुंतवणुकीतून आणि जोखीम मुक्त पद्धतीने चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे. या लेखात आपण साग लागवडीची फायदेशीर पद्धत जाणून घेऊ.
सागाची लागवड पद्धत
सागाची लागवड करण्यासाठी पडीक जमिनीचा व उतार असलेल्या जमिनीचा देखील वापर करून भरपूर नफा मिळवता येणे शक्य असून आजची केलेली लागवड भविष्यात मोठा आर्थिक स्त्रोत निर्माण करू शकते.
सागाच्या लाकडामध्ये असलेले चिवटपणा, तास कामासाठी उत्तम तसेच पाण्यात अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता तसेच आकर्षक रंग इत्यादी गुणांमुळे त्याला खूप मागणी असते.
1- सागाच्या लागवडीसाठी जमिनीची निवड- तुम्हाला ज्या जमिनीत सागाची लागवड करायची आहे त्या जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसातअसणे गरजेचे आहे.साडेआठ पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनीमध्ये सागाच्या झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही व त्यासोबतच जांभ्या खडकाची जमीन सागासाठी उपयुक्त नाही.
एवढेच नाही तर काळी जमीन देखील सागाच्या झाडाला योग्य नाही. चुन्याच्या खडकाची तसेच खोल पोयटा असलेली जमीन यासाठी उत्तम ठरते.सागाच्या झाडाची वाढ प्रामुख्याने जमिनीतील ओलावा,पाण्याचा निचरा होण्याची परिस्थिती तसेच जमिनीची सुपीकता इत्यादी घटकांवर अवलंबून असते.
साग लागवडीचे तीन प्रकार
1- खोड स्टंपाची लागवड- नर्सरी मधुन याकरिता जी रोपे योग्य नसतात ती वाफ्यात जाग्यावर वाढू दिले जातात व पुढच्या वर्षी या रोपांपासून स्टंम्प तयार करतात.
साग लागवडीसाठी जे स्टंप निवडले जातात त्यांच्या मुळ्या सरळ असणे गरजेचे आहे आणि त्या दुभागलेल्या नसाव्यात. सागाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यास 15 महिन्याच्या रोपापासून स्टंम्प तयार करता येतात.
2- सागाच्या बियांची पेरणी- जर आपण मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी शेतातील खड्ड्यात सागाचे बी पेरतात. प्रत्येक खड्ड्यात दोन किंवा तीन बिया टोकतात. परंतु या पद्धतीचे वाईट परिणाम म्हणजे या पद्धतीत सागाची जी काही बारीक रोपे असतात त्यांचे मर होते व त्यामुळे अनेक ठिकाणी खाडे अर्थात गॅप तयार होतो.
3- रोपांची किंवा कलमांची लागवड- महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशात, ओरिसातील शेतकरी शेतात सागाची रोपे लावतात. यासाठी रानामध्ये सागाची रोपे तयार केली जातात किंवा नर्सरी मधुन आणतात. तीन चार महिने वयाचे रोप आणि उंची 30 सेंटिमीटर वाढलेली असली की शेतात लागवडीसाठी ते योग्य ठरते.
नक्की वाचा:Bussiness Idea: नासलेल्या दुधाचा असाही करा उपयोग, बनवा 'हे' दोन पदार्थ अन कमवा भरपूर नफा
आवश्यक हवामान
प्रखर सूर्यप्रकाश सागाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. वार्षिक 1000 ते 1500 मीमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात साग चांगला वाढतो. सागाच्या झाडांना जून ते ऑगस्ट महिन्यात फुले लागतात व नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात पानगळ होते.
पानगळ झाल्याने जमिनीत उन्हाळ्यामध्ये ही पाने कुजतात व जमिनीला नैसर्गिक खाद्य प्राप्त होते. जेव्हा लागवड करायचे असते तेव्हा जूनमध्ये पाऊस सुरू झाला की दोन बाय दोन मीटर अंतरावर 30 बाय 30बाय 30 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये सागाच्या रोपांची लागवड करावी.
लागवड केल्यानंतर रोपाच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही याची देखील काळजी घ्यावी.सागाचे चांगली वाढ होण्यासाठी प्रत्येक रोपाला दहा ग्रॅम नत्र,दहा ग्रॅम स्फुरद आळे पद्धतीने द्यावे व लागवड केल्यानंतर दोन वर्षांपर्यंत पाणी व्यवस्थापन उत्तम ठेवावे. म्हणजे सागाची लागवड जोरदार होते.
उत्कृष्ट प्रतीचे लाकूड मिळवण्यासाठी लागवड अंतर
जर साग लागवडीच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रतीचे लाकूड उत्पादन मिळवायचे असेल तर सागाच्या दोन ओळीतील अंतर 4 मीटर आणि दोन झाडांमधील अंतर दोन मीटर ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे जर तुम्ही एक हेक्टर लागवड केली तर यामध्ये या अंतरानुसार 1250 सागाची झाडे लावता येतात.
मध्यम पावसाच्या प्रदेशात दोन रोपातील अंतर अडीच बाय अडीच किंवा 2.7×2.7 जर ठेवले तर सागाची वाढ जलद होते आणि झाडाचा मुकुट लवकर तयार होतो.
Share your comments