मका,रब्बी ज्वारी , दादर/शाळू
या पिकांवर कधी नव्हे, इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळी पडली, या अळी च्या बंदोबस्ता साठी डेसीस 100 डेलिगेट कोराजन, आवांट अशी फवारणी करूनही अळी आटोक्यात आली नाही,शेतकऱ्यांनी 2/2 , 3/3 वेळा अळी नाशकाचे फवारणी करून प्रत्येक शेतकरी अमेरिकन लष्करी अळी वर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणा साठी डेसीस आंणि क्विनॉलफॉस या कॉम्बिनेशचा , फॉसफोरफाईव्हचा आणि फायटर या सेंद्रिय अळी नाशकाचा ज्या शेतकऱ्यांनी उपयोग केला त्यांना चांगला फायदा झालेला दिसतो, दीर्घ काळ पर्यंत अळी नियंत्रणात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मका या पिकाला झिंक लव्हिंग प्लांट म्हणतात , साधारणतः 30/35 दिवसाचे पीक झाल्यावर चिलेटेड झिंक 20 ग्रॅम फवारणी करावी, खताच्या दुसऱ्या हप्त्यात 40/45 दिवसांनी 10 किलो झिंक सल्फेट द्यावे ,वापसा स्थितीतच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात , मका निसवल्या नंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत 2 पाणी अत्यंत आवश्यक असतात. मक्याचे पीक निसवल्या नंतर एकरी 200 ते 300 ग्रॅम चिलेटेड झिंक आणि 2/3 किलो पोट्टयाशियम पोलीफॉस्फेट दिल्याने मक्याच्या उत्पन्नात चांगली वाढ होते.उन्हाळी मका लागवड डिसेंम्बरच्या 15 तारखेपर्यंतच करतात पण ह्या वर्षी जास्त पाऊस आणि हिवाळा थोडा उशिरा सुरु झाल्यामुळे थंडीचे प्रमाण 20/25 फेब्रुवारी पर्यंत चांगले राहील, त्यामुळे जे शेतकऱ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत मक्याची लागवड करतील त्यांना चांगले उत्पन्न अपेक्षीत आहे ,1 जानेवारी नंतर मका लागवडीला जसजसा उशीर होईल तसतसे उत्पन्नात घट होईल. 10 जानेवारी नंतर लागवड केलेल्या मक्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येईल. माझ्यामते 10 जानेवारी नंतर लागवड केलेल्या मक्याचे उत्पन्न निम्म्यावर येईल.
रब्बी ज्वारी ,दादर/शाळू या पिकांना आवश्यकतेनुसार पीक शेलपानावर असताना, म्हणजे निसवत असताना पाण्याची एक वेळ आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत एक वेळ असे दोन वेळा पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते.
गव्हू
गव्हू या पीकाला थंडी चांगली मानवते, गव्हाचे चांगले उत्पन्न येण्यासाठी 4 ते 5 वेळा सिंचनाची आवस्यकता असते ,
1)उगवणीच्या वेळी पेरणीनंतर
2) 22 ते 25 दिवसांनी मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत,
3)कांडी धरण्याच्या अवस्थेत म्हणजे 40/42 दिवसांनी,
4) गव्हू निसवताना,म्हणजे 60/62 दिवसांनी
5)गव्हाच्या दाण्यात चीक भरण्याची किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत ,म्हणजे साधारणतः 80/82 व्या दिवशी.
वरील प्रमाणे पाण्याचे नियोजन करावे.
गव्हू या पिकाला पेरणी नंतर दुसरे पाणी 20/22 दिवसांनी दिले तर फुटव्यांची संख्या चांगली वाढते.
या वर्षी वाईट हवामानामुळे मावा, अळी, करपा, तांबेरा या रोगांना गव्हाचे पीक बळी पडेल, त्यासाठी मावा आणि अळी नाशकासोबत एम 45 आणि कार्बेनडिझम या बुरशी नाशकांचा वापर करावा.
गव्हू निसल्या नंतर परुंतु ओंबी पकव होण्यापूर्वी , मायको सी सी 25/30 मिली फवारणी करावी ,तसेच याच अवस्थेत 100 ग्रॅम 19/19/19 आणि 40 ग्रॅम पोट्टयाशियम पोली फॉस्फेट ची फवारणी घ्यावी,उत्पन्नात चांगली वाढ होईल.
हरबरा
अत्यन्त कमी पाण्यात येणारे पीक आहे, उगवणीच्या वेळी एक ,दुसरे 35 दिवसांनी आणि 3 रे 70/75 व्या दिवशी अशा तीनच पाण्यात हे पीक घ्यावे ,कोरड मध्ये जमिनीतील वापशावर उगवण झाली असल्यास पेरणीनंतर 40 आणि 75 व्या दिवशी असे दोनच पाण्यात हे पीक चांगले येते. हरबऱ्याला जास्त पाणी दिल्यास मर किंवा उभळ खूप होते यासाठी हलके पाणी देणे उपयुक्त ठरते ,पाट पाण्यापेक्षा तुषार सिंचनाने किंवा ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते. या पिकाला खतांची खूप आवस्यकता नसते, आमच्या चोपडा जिल्हा जळगाव भागात बरेच शेतकरी कोणतेच रासायनिक खत न देता हरभऱ्याचे चांगले उत्पन्न घेतात,
पीक एक दीड महिन्याचे झाल्यावर 19/19/19 100 ग्रॅम आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट 20 ग्रॅम अशी फवारणी घेतल्यास उत्पन्नात वाढ होते.हरबरा या पिकाला पूर्ण फुल लागल्यावर घाटे सेट झाल्यावरच दुसरे पाणी द्यावे, फुलावर असताना पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ होते .या पिकाला साधारणतः55 ते 60 व्या दिवशी फुलोरा अवस्थेत आणि 70 ते 75 व्या दिवशी, मायको सी सी 20 ते 30 मिली फवारणी करावी उत्पन्नात चांगली वाढ होते .
कांदा
या वर्षी मध्यप्रदेश,राजस्थान, गुजरात, करनाटक आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात पावसामुळे कांदा या पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोग पडले आहे.माझ्यामते 50 ते 60% कांदा पीक पीळ रोगला बळी पडले आहे कांदा, कांद्याचे रोप, आणि बिजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यावर रिजेन्ट, स्टिकर, आणि एम45, कार्बेनडीझम, झायनेब 78, आल्व्हीस यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकांची 1/2 वेळा फवारणी करावी. आता पडत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेला खरीप लाल कांद्याला 8/10 दिवस उशीर होईल, त्यामुळे लाल कांद्याची आवक कमी होऊन ओक्तोम्बरनंतर उन्हाळी कांद्याचे भावात सुधारणा होण्याची शक्यता , शेतकरी बंधूनी कोणत्याही अफ् वाना बळी पडून पॅनिक सेल करू नये 20/25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेम्बर् दरम्यान कांद्याचे भाव चांगले राहतील, आपला कांदा, थोडा थोडा, टप्प्या टप्प्या ने विकवा.
उन्हाळी पिके
भुईमूग, बाजरी वैशाखी मूग, उन्हाळी तीळ ,गवार ,कांदा , सोयाबीन वेलवर्गीय भाजीपाला पिके ढेमसे ,कार्ले गिळले ,दोडके , खरबूज, टरभुज, काकडी या पिकांची लागवड साधारणतः 20 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत केली जाते.15 फेब्रुवारी नंतर लावलेल्या उन्हाळी पिकांच्या उत्पन्नात जसजशी लागवड उशिरा होते तसतसे उत्पन्नात घट होत जाते , त्यासाठी कोणतेही उन्हाळी पीक 15 फेब्रुवारीच्या आतच लागवड करावी.
भगवती सिड्स च्या सर्व (36) ग्रुप्स वर उन्हाळी पिकांची सविस्तर माहिती,
उद्या पासून दिली जाईल , ज्या शेतकऱ्यांनी जि पिके लावली असतील त्यांनी ते लेख (स्टार) करून ठेवावेत
Share your comments