भारतात गहू पिकाची लागवड (Cultivation of wheat crop) मोठ्या प्रमाणात केली जाते. गहू हे रब्बी हंगामात प्रामुख्याने घेतले जाणारे पीक आहे. भारतात या पिकाचे उत्पादन आणि वापर मोठ्या प्रमाणात आहेत. कमी खर्चात आणि कमी वेळेत चांगले उत्पादन मिळवून देणारे पीक असेही संबोधले जाते.
गव्हाच्या पिकाची पेरणी करून याची शेती (agriculture) पिकविली जाते. आपण पाहिले तर या पिकाला जास्त कष्ट लागत नाहीत. चार महिन्यांच्या आत हे पिक काढले जाते. म्हणजेच 4 महिन्यांच्या आत शेतकरी या पिकाची कमाई हातात घेवू शकतात. मात्र आपण पाहिले तर अनेक शेतकऱ्यांना गहू पिकाची चांगली जोपासना करूनही चांगले उत्पादन मिळत नाही.
याचे कारण म्हणजे लागवड करतात निवडलेल्या गव्हाचे (wheat) वाण. शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चांगल्या उत्पादनासाठी गव्हाच्या चांगल्या सुधारित वाणांची लागवड करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. महत्वाचे म्हणजे अधिक उत्पादन हवे असल्यास गव्हाच्या या जातीची लागवड फायदेशीर ठरू शकेल.
डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोलसाठी 'या' फळाचे सेवन करावे; ठरेल फायद्याचे..
शास्त्रज्ञांनी गव्हाच्या अशा अनेक वाण विकसित केल्या आहेत. ज्यामधून कमी वेळेत आणि कमी खर्चात उत्तम दर्जाचे धान्य शेतकरी घेवू शकले आहेत. योग्य वेळी पेरणी केल्यामुळे पिकाचे (Agricultural Information) उत्पादनही चांगले येते. आपण पूजा तेजस या गव्हाच्या जातीविषयी माहिती घेणार आहोत.
पुसा तेजस गव्हाचे वैशिष्ट्ये
1) आपण पाहिले तर पुसा तेजस गव्हाचे वैज्ञानिक नाव HI-8759 आहे. हा वाण ब्रेड, बेकरी उत्पादने, नूडल, पास्ता आणि मॅकरोनी सारखी उत्पादने बनवण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो.
2) गव्हाची ही सुधारित जात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन-ए आणि जस्त यांसारख्या पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे. यासह गेरूआ रोग, कर्नल बुंट रोग, खिरणे या रोगाची शक्यता नसते. त्यामुळे उत्तम दर्जाचा मानला जातो.
दिलासादायक बातमी! सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जमा होणार पीएम किसान योजनेचे पैसे
पेरणीचा कालावधी
पुसा तेजस गव्हाच्या (Pusa Tejas wheat) पेरणीसाठी 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर ही सर्वात योग्य वेळ आहे. या दरम्यान एकरी 50 ते 55 किलो बियाणे, प्रति हेक्टरी 120 ते 125 किलो बियाणे आणि प्रति बिघा 20 ते 25 किलो बियाणे वापरा. पुसा तेजस गव्हात कळ्यांची संख्याही जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडते.
गहू उत्पादन
पुसा तेजस (Pusa Tejas) गव्हाच्या जातीची पेरणी केल्यास 115 ते 125 दिवसांत 65 ते 75 क्विंटल उत्पादन सहज मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुसा तेजस जातीची लागवड केल्यास फायद्याचे ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या
रेल्वे स्टेशनवर होणार आधार कार्ड संबंधित महत्वाची कामे; UIDAI ने आखली मोठी योजना
ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत जमा करा फक्त 95 रुपये; 14 लाख रुपयांचा होईल फायदा
तुमच्या चालण्यावरून तुमचे तारुण्य ठरत असते; अशाप्रकारे चाललात तर तारुण्य राहील कायम
Share your comments