MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

आगामी खरीप हंगामाकरिता सोयाबीन पिकाच्या बियाण्याचे नियोजन व उगवण क्षमता तपासणे असते आवश्यक

शेतकरी बंधुंनो, आपण सर्व जागतिक संकटाला सामोरे जात आहोत आणि त्यामुळे आगामी खरीप हंगामात उत्पादन खर्चात बचत करून अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता व निव्वळ नफा वाढविण्याकरता काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. बंधुंनो सोयाबीन हे आपल्या महत्वाचे पीक यावर्षी या या पिकाच्या बियाण्यासंदर्भात बाहेरुन बाजारातून मोठ्या प्रमाणात बॅगचे बियाणे खरेदी करून अनाठाई खर्च थांबवा.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सोयाबीन पिकाच्या बियाण्याचे नियोजन

सोयाबीन पिकाच्या बियाण्याचे नियोजन

शेतकरी बंधुंनो, आपण सर्व जागतिक संकटाला सामोरे जात आहोत आणि त्यामुळे आगामी खरीप हंगामात उत्पादन खर्चात बचत करून अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता व निव्वळ नफा वाढविण्याकरता काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. बंधुंनो सोयाबीन हे आपल्या महत्वाचे पीक यावर्षी या या पिकाच्या बियाण्यासंदर्भात बाहेरुन बाजारातून मोठ्या प्रमाणात बॅगचे बियाणे खरेदी करून अनाठाई खर्च थांबवा.

सोयाबीन हे स्वयम् परागीकरण करणारे पीक असल्यामुळे तसेच या पिकात सरळ वाणांचा वापर होत असल्यामुळे घरचे सोयाबीनचे बियाणे तयार करून त्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करा. घरचे सोयाबीनचे बियाणे पेरणी करावयाचे आहे म्हणजे घरचे सोयाबीन पेरायचे नाही नाही हे लक्षात घ्या. घरचे सोयाबीनचे बी म्हणजे योग्य पद्धतीने कापणी व मळणी केलेले (मळणी करताना मळणी यंत्राचे आरपीएम चारशेच्या वर नसावे अन्यथा सोयाबीनच्या बियाण्याच्या कवचाला तडा जातो) बियाणाला कोणत्याही प्रकारचा मार न लागलेले योग्य पद्धतीने साठवण केलेले तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे कमीत कमी 70 टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतकरी बंधूंनो आता आपण पेरणीपूर्व सोयाबीनचे बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासतात ते पाहू

घरच्या घरी सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी?

सोयाबीनच्या बियाण्याची उगवण शक्ती तपासण्याची पद्धत क्रमांक एक :

(१) घरच्या घरी सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मुठभर सोयाबीन बियाणे बाहेर काढा. सर्व पोत्यातील बाहेर काढलेले सोयाबीन बियाणे एकत्र करून घ्या.
(२) गोनपाटाचे सहा चौकोनी तुकडे
घेऊन स्वच्छ धुऊन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा.
(३) पोत्यातून काढलेल्या सोयाबीन मधून सरसकट शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटिमीटर अंतरावर १० - १० च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवा अशाप्रकारे 100 दाण्याचे तीन नमुने तयार करा
(४) गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करा व बियाण्यावर दुसरा गोन पाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारा.
(५) गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्याससकट गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावली ठेवा त्यावर अधून मधून पाणी शिंपडून ओले ठेवा
(६) सहा ते सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडा. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तीनही गुंडाळण्याची सरासरी काढून 100 दाण्यापैकी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे उगवणी च्या गुणवत्तेचे आहे असे समजा आणि शिफारशीप्रमाणे बियाण्याचा दर ठेवून पेरणीसाठी वापरा.
(७) जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या 70 पेक्षा कमी असेल उत्तरेकडील बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा. जितके टक्के कमी उगवण दिसून येते, एकरी शिफारशीत बियाण्याच्या दरापेक्षा तितके टक्के जास्त बियाणे वापरावे मात्र साठ टक्क्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये.
(८) सोयाबीनच्या बियाण्याला पेरणीपूर्वी Carboxin 37.5 टक्के अधिक Thiram 37.5 टक्के याविषयी बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात व नंतर पंधरा ते वीस मिनिटानंतर रायझोबियम व पीएसबी या जिवाणू खताची अडीशे ग्रॅम प्रति दहा किलो बी या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी.
 

(B) सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याची पद्धत क्रमांक 2:

शेतकरी बंधुंनो ही पद्धत शिफारशीत पद्धत नसून वाशीम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवावर हि विकसित केली आहे. या पद्धतीत वरील पद्धत क्रमांक एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व पोत्यातील मुठ मुठ सोयाबीन बियाणे काढून मिसळून तयार केलेल्या नमूनयातून शंभर दाणे मोजून वेगळे करा. असे शंभर शंभर दाणे यांचे तीन संच तयार करा. शक्यतो काचेच्या 3 ग्लासात पाणी घेऊन त्यात हे 100 दाणे टाका. पाच ते सात मिनिट हे दाने तसेच राहू द्या. त्यानंतर पाणी फेकून देऊन दाणे वेगळे काढा व त्यातील पुर्णता फुगलेले व बियाण्याच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळी करा. दोन्ही प्रकारच्या दाण्याची संख्या मोजून घ्या.

जो दाना पाच ते सहा मिनिटे पाण्यात ठेवल्यानंतर टम्म फुगला तो पेरणीसाठी अयोग्य असतो कारण अशा बियांच्या टरफललाला इजा झालेली असल्याने किंवा बिजांकुर कुजल्यामुळे त्यामध्ये पाणी लवकर आत शिरते व तो लवकर फुगतो. मात्र जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबूत असल्यामुळे त्याच्यात पाणी लवकर आत शिरत नाही फक्त टरफलातून थोडे पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरकुत्या पडल्या सारख्या दिसतात त्यामुळे शंभर पाण्यापैकी सरासरी सत्तर किंवा जास्त गाणे अशा प्रकारचे न फुटलेले सुरकुत्या आलेले असतील तर आपल्याकडे असलेले सोयाबीन बियाणे योग्य क्षमतेचे म्हणजे 70 टक्के उगवणक्षमता असलेले आहे असे समजावे. हे बियाणे शिफारशीत बियांच्या दराप्रमाणे वापरता येईल परंतु बियाण्याची उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात बियाण्याचा दर वाढवावा व साठ टक्क्यापेक्षा कमी उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी अयोग्य समजून असे बियाणे पेरणी साठी वापरू नये.

 

शेतकरी बंधूंनो निर्देशित पद्धतींपैकी क्रमांक एक ही शास्त्रोक्त शिफारशीत पद्धत असून पूर्व नियोजनात याच पद्धतीने बियाण्याची उगवण क्षमता तपासणे योग्य असते परंतु अचानक वेळेवर आपल्याला एखाद्याकडून घरचे सोयाबीन विकत घेण्याकरता व वेळेवर बियाण्याची उगवण क्षमतेचा अंदाज येण्याकरता क्रमांक 2 मध्ये दिलेल्या पद्धतीचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो.

बंधुंनो घरची बियाणी वापरताना नवीन शिफारशीत वाहनाचे बियाणे विरजण म्हणून कमी प्रमाणात आणून स्वतःच्या शेतातील अनुभवानुसार अनुभवानुसार पुढील वर्षी हे बियाणे स्वतः घरी तयार करून मोठ्या प्रमाणात पुन्हा वापरता येईल.शेतकरी बंधूंनो आपण घरचे बियाणे वापरून जवळ जवळ बियाण्यावर होणारा अर्धा खर्च वाचवू शकतो आणि सोयाबीन बियाणे बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो. चला तर मग थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आगामी खरीप हंगामात सोयाबीनचे घरचे बियाणे वापरून उत्पादन खर्चात कपात करू.

लेखक

राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Planning and germination capacity of soybean crop for the forthcoming kharif season is required 7 Published on: 07 May 2021, 09:03 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters