राज्यात अनेक भागात भुईमूग लागवड बघायला मिळते. भुईमुगाची लागवड खरीप हंगामात तसेच उन्हाळी हंगामात देखील केली जाऊ शकते. मात्र असे असले तरी उन्हाळी हंगामात भुईमूग पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी कीड व्यवस्थापन व रोग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. जर उन्हाळी भुईमुगाचे व्यवस्थित व्यवस्थापन केले गेलेकर यापासून खरीप हंगामापेक्षा अधिक उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. कृषी वैज्ञानिकांच्या मते भुईमूग पिकासाठी सूर्यप्रकाश व ऊबदार हवामान अनुकूल असते.
म्हणजे भुईमूग पिकासाठी समशीतोष्ण हवामानाच्या आवश्यकता असते हे समशीतोष्ण हवामान उन्हाळ्यात भुईमूग पिकाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होते त्यामुळे भुईमूग उन्हाळी हंगामात लागवड केली असता यापासून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. ज्या भागात उन्हाळ्यात मुबलक पाणी साठा असतो त्या प्रदेशात याची लागवड केली जाते. 24 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान भुईमूगच्या पिकासाठी अनुकूल असते या तापमानात भुईमूग पीक जोमात वाढते शिवाय यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. मात्र 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात भुईमुगाचे पीक चांगले वाढत नाही तसेच अशा तापमान असलेल्या ठिकाणी याची लागवड केली असता यापासून उत्पादनात घट बघायला मिळते.
शेतकरी बांधवांनो जर आपणास हे उन्हाळी भुईमूग लागवड करायची असेल तर पेरणी योग्य वेळी होणे महत्त्वाचे ठरते. असे सांगितले जाते की दिवस लहान आणि रात्र मोठी असली तर भुईमुगाचे पीक हे जोमात वाढते शिवाय या पासून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. त्यामुळे मध्ये उन्हाळ्यात याची लागवड करू नये कारण की तेव्हा दिवस हे मोठे असतात. मोठे दिवस असल्यास भुईमुगाचे पीक वाढण्यास विलंब होतो. भुईमूग पिकाला फुले येण्याचा सर्वोत्तम काळ फेब्रुवारी महिना असल्याचे कृषी वैज्ञानिक सांगत असतात. भुईमुगाची पेरणी ही साधारणपणे जानेवारी महिन्यात केल्यास यापासून चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे उन्हाळी भुईमुगाची पेरणी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करावी.
जरी भुईमुगाची पेरणी जानेवारी महिन्यात करावी असा सल्ला दिला जातो तरीदेखील जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण अधिक असेल तर पेरणीही पुढे ढकलून द्यावी. कारण की भुईमूग थंडीत जोमाने वाढत नाही. जानेवारी महिन्यात थंडी असताना देखील जर पेरणी केली तर भुईमूग पिकाला अंकुरण्यासाठी उशीर होतो आणि त्यामुळे साहजिकच याचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ शकतो त्यामुळे भुईमूग पिकाची पेरणी करताना जानेवारी महिन्यात तापमान 25 ते 27 डिग्री सेल्सिअस दरम्यान असेल तरच करावी अन्यथा याची पेरणी पुढे ढकलून केली तरीदेखील चालते.
Share your comments