दर्शपर्णी अर्क हे दहा निरनिराळ्या जंगली झाडांच्या पानांच्या (प्राणी/जनावरेही पाने खात नाहीत) अर्कापासून विकसीत केलेले जैविक कीडनाशक आहे. कापसावरील सर्व प्रकारची कीड व्यस्थापनासाठी हा अर्क परिणामकारक आहे, या किडीमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी(रसशोषक कीडी) थ्रिप्स(फुलकिडे),पिलावा, अळ्या, लिप फोल्डर, लिप हॉपर, आणी विविध प्रकारची बुरशी अशा किडींचा समावेश आहे. यामध्ये कडुलिंब असतो तो अंडनिसेपणाचा प्रतिरोध करतो तसेच गाईचे शेण व गोमुत्र असते जो जैव खताच्या रूपात जमिनीमध्ये सुक्ष्मजीव क्रियेला प्रोत्साहन देते. हा अर्क सहजपणे बनवता येतो आणी पुढील उपयोगासाठी बराच काळ संग्रहीत/साठवून ठेवता येतो.
घटकद्रव्य:
अ. क्र. |
घटक |
मात्रा |
१ |
कडुलिंब (अझाडीराक्टा इंडिका) |
५ किग्रॅ |
२ |
निरगुंडी (व्हिटेक्सनिगुंडो) |
२ किग्रॅ |
३ |
हक्काबोन/अर्कमुळा (अरिस्टोलोकीया) |
२ किग्रॅ |
४ |
पपई (कॅरीका पपया) |
२ किग्रॅ |
५ |
गिलोय,गुळवेल, गुडूची (टिनोस्पोरकॉर्डिफोलिय) |
२ किग्रॅ |
६ |
सिताफळ (अनोना स्कवामोसा) |
२ किग्रॅ |
७ |
कारंजा (पोंगामिया पिन्नाटा) |
२ किग्रॅ |
८ |
एरंड (रिसीनस कम्युनिस) |
२ किग्रॅ |
९ |
कन्हेर (नेरियम इंडिकम) |
२ किग्रॅ |
१० |
रुई (कॅलोट्रोप्रिस प्रोसेरा) |
२ किग्रॅ |
आधिक पर्याय:
क्लरोन्ड्रोन फलोमेडीस (अरणि)
|
दतुरास्ट्रमोनिसम (चतुरा)
|
आसपोनिया कार्निया (बेशरम )ची पाने सुद्धा घेता येतात.
|
पेस्ट:
हिरवी मिरची पेस्ट |
2किग्रॅ |
लसूण पेस्ट |
250ग्रॅम |
गाईचे शेण |
3किग्रॅ |
गोमुत्र |
5 लिटर
|
वरील सर्व पदार्थ चिरुन ,भरडून 150 लिटर पाण्यात मिश्रण करुन 28ते 30 दिवस आंबवण्यासाठी सावलीत कापडाने झाकुन ठेवावे. दिवसातून तीनवेळा मिश्रण नियमितपणे काडीने ढवळावे 28 ते 30 दिवसानंतर मिश्रणगाळून भरून ठेवावे. तयार झालेले अर्क सहा महिन्यापर्यंत वापरता येते. सदर मिश्रण टे फक्त प्लास्टिक ड्रम किंवा सिमेंट टाकीमध्येच टाकावे.
प्रयुक्ती:
फवारणी यंत्रामध्ये ३ लीटर अर्क ७ लीटर पाणी असे ५० पंप होतात व १ एकरासाठी १० पंप असे ५ एकरासाठी वापरता येतो.
अर्क बनवण्यासाठी खर्च:
अर्क बनविण्यासाठी लागणार खर्च हा सर्वस्वी भाजीपाल्याची(लसूण,मिरची) बाजारभावच्या किंमतीवर अवलंबून आहे.
मिरची |
2किग्रॅ ×40(रु. प्रती किग्रॅ) |
80रु |
लसूण |
250ग्रॅ×150 (रु/किग्रॅ) |
38रु. |
गाईचे शेण |
3किग्रॅ×5(रु/किग्रॅ ) |
15रु. |
गोमुत्र |
5लि×5(रु/लिटर) |
25रु. |
फायदे:
1.अल्पखर्चात बनविण्यात येणारी औषधी.
2.माणसाच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम आढळून येत नाही.
3.बनविण्यासाठी अगदी सहज आणी सोपा.
4.जमिनीची सुपीकता टिकून राहते.
5.झाडाच्या वाढीसाठी मदत होते.
6.लागत खर्च कमी होतो(cost of cultivation)
7.उत्पनात वाढ(net profit increase)
8.मित्र किडीची हानी होत नाही.
9.जमिनीतील पोषक जिवाणू जिवंत राहतात.
लेखक
श्री.शिवशंकर पा.काकडे
सहाय्यक प्राध्यापक
किटकशास्त्र विभाग
विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा बु
कु.जान्हवी गजानन डोसे
विद्यार्थी कृषी कार्यानुभव कार्यक्रम
विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा बु
Share your comments