Agripedia

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले जातात. यामधीलच एका यशस्वी प्रयोगाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यातून शेतकरी सहज भरघोस उत्पादन घेऊ शकतील.

Updated on 11 August, 2022 2:31 PM IST

शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमध्ये (agriculture) नवनवीन प्रयोग केले जातात. यामधीलच एका यशस्वी प्रयोगाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यातून शेतकरी सहज भरघोस उत्पादन घेऊ शकतील.

शेती क्षेत्रातील (agricultural sector) यशस्वी प्रयोग म्हणजे, मल्टी लेयर फार्मिंग अर्थात बहुस्तरीय शेती. या शेती तंत्रात शेतकरी एकाच जमिनीवर एकाच वेळी ४ ते ५ प्रकारची पिके घेऊ शकतात. बहुस्तरीय शेती ही मुख्यत्वे नगदी पिकांवर आधारित असते आणि त्यात भाजीपाला, फळे आणि फुलांची लागवड समाविष्ट असते.

या तंत्राचा अवलंब करून शेतकरी आपल्या जमिनीचा जास्तीत जास्त वापर करू शकतात. शेतकरी एकाच जमिनीवर विविध पिके, भाजीपाला, फळे आणि औषधी वनस्पती (Medicinal plants) एकाच वेळी उगवू शकतात.

Agricultural Business: शेतातील तण काढणीवर शोधला जालीम उपाय; आता शेतकऱ्यांची कामे जलदगतीने होणार

बहुस्तरीय शेतीमध्ये जमीन, पाणी, खत, खते यांचा योग्य वापर होतो. ही एक शाश्‍वत प्रणाली आहे ज्यामध्ये शेतकरी वर्षभर पिकांची लागवड करू शकतो. यामुळे एकाच वेळी अधिक उत्पादन मिळू शकेल. या प्रकारची शेती जमिनीची धूप कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

जमिनीचा पोत आणि सुपीकता राखण्यासाठी मल्टी लेयरचा (Multi layer) वापर केला जाऊ शकतो. कोणत्याही कीड किंवा रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी या प्रकारची लागवड सर्वोत्तम आहे.

बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी; सलग 6 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या कारण

बहुस्तरीय शेतीमध्ये ही पिके निवडा

1) नारळासोबत कॉफी आणि मिरपूडची लागवड (Cultivation) करता येते. यासोबत नारळासोबत केळी आणि कॉफीची पेरणी देखील करू शकता.
2) तसेच तुम्ही आंब्यासोबत पेरू आणि चवळीची लागवड करू शकता. याशिवाय नारळासोबत जॅकफ्रूट, कॉफी, पपई आणि अननस निवडता येईल.
3) तूर सोबत भुईमूग व तीळाची लागवड करणेही उत्तम. तूर सोबतच तांदूळ आणि काळे हरभरे देखील घेता येतात. उसासह मोहरी आणि बटाटा हे उत्तम आंतरपीक संयोजन आहे.
4) पालकासोबत मुळा आणि कांदा हे चांगले कॉम्बिनेशन आहे. सुरणासह काकडी आणि फ्लॉवरची लागवड करता येते. मक्याबरोबरच हरभरा आणि भुईमूग यामधूनही बहुस्तरीय शेतीत चांगले उत्पादन मिळते.

महत्वाच्या बातम्या 
Bird Flue: कुक्कुटपालकांसाठी आनंदाची बातमी; शास्त्रज्ञांनी लाँच केली बर्ड फ्लूची पहिली लस
Agricultural Business: ऐकलं व्हयं! सर्पगंधा लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न; जाणून घ्या...
'या' राशीच्या लोकांना करियरबाबद मिळणार आनंदाची बातमी; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

English Summary: Multi Layer Farming earn millions Multi Layer Farming
Published on: 10 August 2022, 12:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)