1. कृषीपीडिया

अशा पद्धतीने करा हरभरा लागवडीचे नियोजन, एकरी निघेल 16 क्विंटल उत्पादन; कृषी तज्ञांचा सल्ला

रब्बी हंगामाची वेळ जवळ आली आहे. खरीप हंगाम हा जवळजवळ जास्त पावसामुळे वाया गेला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामा कडून मोठ्या आशा आहेत. रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा हे दोन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातात. हरभरा पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने ही भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून हरभऱ्या बियानाचा पुरवठा केला जात आहे. हरभऱ्याचे दर दर वर्षी पेक्षा जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर कृषी तज्ञ पंजाबराव डखयांचा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gram crop

gram crop

रब्बी हंगामाची वेळ जवळ आली आहे. खरीप हंगाम हा जवळजवळ जास्त पावसामुळे वाया गेला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामा कडून मोठ्या आशा आहेत. रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा हे दोन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातात. हरभरा पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने ही भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून हरभऱ्या बियानाचा पुरवठा केला जात आहे. हरभऱ्याचे दर दर वर्षी पेक्षा जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर कृषी तज्ञ पंजाबराव डखयांचा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.

 रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास शेतकर्‍यांनी नेमके काय करावे याबाबत पंजाबराव डखयांनी सल्ला दिला आहे. या लेखात आपण त्या बाबतीत माहिती घेऊ.

पंजाबराव डख यांनी दिलेला सल्ला

  • शेतकरी बर्‍याचदा बाजारातील महागडे बियाणे खरेदी करतात. पण घरगुती बियाणे वापरले तर उत्पादनही भरघोस होणार आहे. याकरिता 9211 हे बियाणे वापरणे आवश्यक आहे. दप्तरी हे देखील  बियाणे चांगले आहे यामध्ये हरभऱ्याच्या घाटी गळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जमिनीसाठी पोषक असलेल्या 9211 घरगुती बियाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
  • शेतकरी एकरी 25 किलो बियाणे पेरतात. मात्र हरभरा जितका दाट तेवढ्या अधिकचे उत्पादन त्यामुळे शेतकऱ्यांनी एकरी 40 ते 45 किलो बियाणे हे जमिनीत गाडणे आवश्यक आहे जेवढे दाट पेरणी तेवढे उत्पादन जास्त हेच अधिकच्या उत्पादनाचे सूत्र आहे.

खतनियोजन

 एकरी डीएपी ची एक बॅग व त्याच्यासोबत पाच किलो गंधक मिसळून पेरणी केल्यास पिकाची वाढ जोमदार होते.

हरभरा पिकाची पेरणी ची पद्धत

 बदलत्या काळानुसार आता पेरणी ही ट्रॅक्टर द्वारे केली जाते. मात्र खोलवर फिरण्यास अधिकच डिझेल लागत असल्याने ते वरच्या वरती सोडले जाते. त्यामुळे उगवण क्षमता ही कमी होते. त्यामुळे पेरणी करताना जास्तीचे पैसे दिले तरी चालतील पण बियाणे हे जमिनीत खोलवर जाणे गरजेचे आहे.जमिनीचा ओलावा कमी झाला की उगवणक्षमता हीवाढते. चीभडत असलेल्या जमीन क्षेत्रात अधिकचा खोलवर पेरणी केली की त्यात पिकाची उगवण ही जोमात होते.

पाणी व्यवस्थापन

 पेरणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्प्रिंकलरने पाणी केवळ दोन तास घ्यायचे आहे. पाटाने पाणी दिले की हरभऱ्याच्या उगवणक्षमता यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पहिले पाणी केवळ दोन तास स्पिंकलर च्या साह्याने द्यायचे आहे. दुसरे पाणी हे 20 दिवसांनी तेही चार तास स्प्रिंकलर चालू ठेवायचे आहे. हरभरा पीक फुलावर असताना पाणी द्यायचे नाही.

अन्यथा फुल गळण्याचे प्रमाण वाढते. या पद्धतीने पेरणीपासून काढणीपर्यंत ची नियोजन केले तर एकरी 16 क्विंटल उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास पंजाबराव ढोक यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी

  • खरिपात आधीचा पाऊस झाल्याने रब्बीतील पेरण्या लांबणीवर पडले आहेत.
  • पेरणीपूर्वी हलक्‍या प्रकारचे मशागत करून वेळ खर्ची न करता थेट  पेरणीला सुरुवात करायची आहे.
  • रब्बी हंगामातील हरभरा हेच मुख्य पीक राहणार आहे.
  • आता पावसाने उघडीप देताच रब्बी हंगामातील  कामे उरकून घेणे आवश्यक आहे.

( माहिती स्त्रोत- हॅलो कृषी )

English Summary: method of gram crop cultivation get 16 quintal production to gram crop Published on: 20 October 2021, 10:02 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters