शेतकरी बांधव बऱ्याच प्रमाणात सध्या फळे आणि भाजीपाला या पिकांची लागवड करून त्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा कमवत आहेत.परंतु सातत्याने होत असलेल्या तापमानातील बदल तर कधी खताच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये विकृती निर्माण होते
त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. बर्याचदा रात्रीचे तापमान कमी झाल्यावर जास्त आर्द्रता आणि नायट्रोजनचे पातळी वाढली की त्यांचा पपई पिकावर दुष्परिणाम होत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे फळांमध्ये विकृती निर्माण होऊन त्यांचा आकार बदलून फळांचे भाव खाली येतात व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.
या पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांपासून सुटका व्हावी यासाठी अखिल भारतीय पळ संशोधन प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आणि सहयोगी संचालक डॉ.राजेंद्रप्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, समस्तीपुर बिहार यांनी या रोगापासून बचाव कसा करायचा हे सांगितले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अशा फळांपासून बिया गोळा करणे आवश्यक आहे, ज्यांना हा प्रकार होत नाही असे त्यांनी सांगितले.
पपई फळातील रोगाची कारणे
जमिनीमध्ये बोरॉनया सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता असते तेव्हा पपई पिकावर रोग उद्भवतात. शिवाय हवामान कोरडे होते तेव्हा पिकावर हा प्रकार अधिक दिसून येतो. त्यासाठी कृषी तज्ञ म्हणतात की जेव्हा जमिनीत बोरॉनची कमतरता असते तेव्हा झाडाची वाढ थांबत. उलट जवळच्या उती मध्ये वाढ होते त्यामुळे फळे येतात आणि खराब होतात.
पपई फळांचा आकार बिघडण्याची कारणे..
- बोरॉनच्या कमतरतेमुळे प्रभावी फळांमध्ये बियाणे तयार होत नाही किंवा कमी विकसित होते.
- झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन झाडांची उंची लहान होते.
- अपरिपक्व फळाच्या पृष्ठभागावर दूध दिसून येते.
- फळ कडक होते व अशी फळे लवकर पिकत नाहीत आणि चवहीन नसतात
- फळांचा आकार खराब होतो.
- झाडांवर फुले पडू लागतात.
उपायोजना
- अशा परिस्थितीत पपई लागवडीत सेंद्रिय खतांचा मुबलक वापर करावा.
- जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे.
- मातीतील बोरॉनचे प्रमाण तपासून घेऊन त्याप्रमाणे पुरवठा करावा. ( संदर्भ- हॅलो कृषी)
Share your comments