शेतकरी सध्या पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत आहेत. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढत आहे. तसेच त्यांना चार पैसे देखील मिळत आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची शेतातील कामाची लगबग सुरू आहे. यामुळे आता शेतात काय लावायचे असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल.
या शेतकऱ्यांसाठी आता तीळ (Sesame Crop) हे देखील पावसावर अवलंबून असलेल्या पिकांपैकी एक आहे. या पिकाच्या लागवडीसाठी चांगला पाऊस आणि सुपीक माती आवश्यक आहे. तीळची देखील मोठ्या प्रमाणात भारतात पेरणी केली जात आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील तिळची पेरणी करत असतात. यामधून त्यांना चांगले पैसे देखील मिळतात.
यामध्ये तिळाच्या कांके या सुधारित जातीची माहिती घेऊन लागवड केल्यास आपले उत्पन्न नक्कीच वाढणार आहे. तीळाच्या कांके जातीला उच्च उत्पादन क्षमता असलेले बियाणे म्हणतात, जे चांगले तेल उत्पादन देते. कांके तिळाची जात साहजिकच, तीळ लागवडीचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त तेल उत्पादन मिळवणे हा आहे. कांके जातीच्या तीळाचा रंग पांढरा असतो, त्याची लागवड खरीप हंगामात केली जाते.
उद्यापासुन महागाई रडवणार, खाणं-पिणं आणि वैद्यकीय सेवाही महागणार
यामुळे सध्याचा काळ लागवडीसाठी चांगला आहे. त्याची लागवड पाऊस आणि सूर्यप्रकाशाच्या दरम्यान केली जाते, ज्यामध्ये खबरदारी घेतल्यास चांगला नफा मिळू शकतो. तीळाची ही एक जा जी पेरणीनंतर 75 ते 80 दिवसांत परिपक्व होते आणि काढणीसाठी तयार होते. कांके जातीच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही.
एक हेक्टर जमिनीवर कांके जातीची लागवड केल्यास 4 ते 7 क्विंटल तीळ मिळू शकतात. जे 42 ते 45 टक्के तेल उत्पादीत करून देऊ शकते. तेल उत्पादनाच्या दृष्टीने कांके जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. दुप्पट नफ्यासाठी बागायती पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करता येते. तिळाची लागवड वर्षातून तीनदा केली जाते.
आता हायगय करायची नाही! एकदा आमदार,आयुष्यभर पगार, राज्यात 653 माजी आमदार मंत्र्यांना निवृत्ती वेतन
असे असले तरी खरीप हंगामात तिळाची लागवड केल्यास उत्तम दर्जाचे उत्पादन मिळते. राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामधून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले पैसे मिळतात.
महत्वाच्या बातम्या;
आता रक्तही महागणार! महागाईचा भडका उडत असताना बाटलीमागे १०० रुपये दरवाढ, प्रस्ताव सादर
आम आदमीची देश जिंकण्याची तयारी सुरू, दिल्ली पंजाबनंतर आपचा मध्यप्रदेशातही विजय
आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..
Published on: 19 July 2022, 04:36 IST