ज्वारी पिकावरील किडींचा जर एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करून बंदोबस्त केला तर कमीत कमी उत्पादन खर्चात ज्वारीच्या उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ आढळून येते.त्यामुळे वेळीच ज्वारी वर आलेल्या रोगांची एकात्मिक कीडनियंत्रण करणे महत्त्वाचे असते. या लेखात आपण ज्वारी पिकावरील खडखड्या आणि तांबेरा रोगाची माहिती घेऊ.
ज्वारी वरील खडखड्या रोग
हा रोग बुरशीमुळे होतो. हलक्या जमिनीवरील कोरडवाहू रब्बी ज्वारीचे पीक या रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडते या रोगाची लागण पीक फुलोरा अवस्थेत असताना किंवा त्यानंतरच्या काळात ताटाच्या जमिनीलगतच्या दुसर्या किंवा तिसर्या कांड्याला होते. रोगग्रस्त कांडी आतून पोकळ होतात. अशा कांड्यांचा उभा छेद घेतला असता मध्ये फक्त काळे धागे आढळून येतात. अशी रोगग्रस्त झाडे वाऱ्यासोबत हलताना खडखड असा आवाज करतात, म्हणून या रोगास खडखड्या रोग असे म्हणतात. अशा झाडांच्या कणसात दाणे बरोबर भरत नाही.रोगग्रस्त झाडे जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यास धोका संभवतो. या रोगामुळे धान्य उत्पादनात तर घट होतेच त्याचबरोबर कडब्याची प्रत सुद्धा खराब होते.
खडखड्या रोगाचे नियंत्रण
- पिकांची फेरपालट करावी.
- हलक्या जमिनीवर जिरायती रब्बी ज्वारी पेरणी करताना खडखड्या रोगास प्रतिकारक्षम जातींचा वापर करावा.
- पीक फुलोरा अवस्थेत असताना शक्य असल्यास पाण्याची एक पाळी द्यावी.
- खताची योग्य मात्रा दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
- हमखास खडखड्या रोगाचा प्रादुर्भाव होणाऱ्या भागात सुडोमोनास क्लोरोरॅफीसया जिवाणूजन्य घटकाची बीज प्रक्रिया करावी.
ज्वारी वरील तांबेरा रोग
प्रथमतः आज चमकणारा जांभळट तांबड्या रंगाचा ठिपका दिसतो.तीव्रता वाढल्यावर पानाचा मोठा भाग व्यापला जातो. तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या पानामध्ये पानाच्या खालच्या बाजूवर लहान पुटकुळ्या येतात. त्यामुळे संपूर्ण पानाच्या उतीनष्ट होऊन पूर्णपाननष्ट होऊ शकते.
तांबेरा रोगाचे नियंत्रण
- बुरशी रहित बियाणे वापरावे. पिकाची फेरपालट करावी. पूर्वी या रोगाला बळी पडलेल्या वानांचे अवशेष नष्ट करावे.
- पेरणीनंतर एक महिन्याने दहा दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
Share your comments