गुलाबी बोंड अळीने कापूस पिकाला मोठे आव्हान दिले असून गुलाबी बोंड आळी चा कापूस लागवडीवर वाईट परिणाम होतो. ही कीड फक्त कापूस पिकातच आढळते. या किडीने भारतातील कापूस उत्पादक प्रदेश उद्ध्वस्त केले असून एका अहवालानुसार, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात या किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.
या गुलाबी बोंड आळी मुळे कापसाची गुणवत्ताच खराब होत नाही तर कापूस पिकाचे उत्पादन 30 टक्क्यांनी कमी करते. याबाबतीत सेवानिवृत्त कृषी उपसंचालक पी.एन.शर्मा म्हणाले की,आज देशातील कोणतेही राज्य या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहिले नाही.या किडीच्या प्रतिबंधासाठी संशोधक,राज्याचे कृषी अधिकारी कृषी विज्ञान केंद्रे सातत्याने त्याच्या व्यवस्थापनाची व्यवस्था करत आहेत.
नक्की वाचा:२५० रुपये खर्च करून 'हे' खात चालू करा अन मिळवा तब्बल १५ लाख, वाचा सविस्तर
कापसाचे शत्रू असलेल्या गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन आवश्यक आहे
आता कापूस पेरणीची वेळ आली असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्याच्या व्यवस्थापनाचा सल्ला देताना पीएन शर्मा म्हणाले की,शेतकऱ्यांनी जास्त कालावधीचा कापसाची पेरणी करू नये,तर केवळ 140 ते 160 दिवसांत पिकणारे कापूस बियाणे वापरावे.
ते पुढे म्हणाले की, जिनिंग कारखान्यातून कापसाचे बियाणे आणून लागवड करू नये कारण त्या बियाण्यात गुलाबी आळ्या मोठ्या प्रमाणात राहतात. काही राज्यांमध्ये बरेच शेतकरी जिनिंग कारखान्यातून कापसाचे बियाणे आणून लागवड करतात अशा शेतकऱ्यांच्या शेतात गुलाबी बोंड आळी दाखल होत आहे.
पीएन शर्मा पुढे म्हणाले की, सामान्य शेतकरी एकाच प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर करत राहतो. त्यामुळे संबंधित कीटकनाशकाच्या विरोधात कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशके वापरावी.
नक्की वाचा:दुकानदाराने खते दिली नाहीत तर मोबाईवर चेक करा खतसाठा, खत विक्रेत्यांच्या मनमानीला लगाम
गुलाबी बोंड अळी कशी शोधायची?
गुलाबी बोंड आळी फुलांवर आणि बिजांडावर अंडी घालते आणि तिचे अळ्या तयार होऊन ते कापसाच्या बोंडात शिरतात. पीएन शर्मा यांनीसांगितले की,गुलाबी बोंड अळीला फेरोमन सापळे लावून शोधली जाते.
फेरोमन सापळा मादी आळी चा वास देतो त्यामुळे या वासामुळे नर आकर्षित होऊन जाळ्यात अडकतो. जेव्हा नरांची संख्या कमी होते तेव्हा पुढील पुनरुत्पादन चक्र विस्कळीत होते. तसेच यामुळे शेतकऱ्यांना गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्याचे देखील समजते व त्याचे योग्य व्यवस्थापनासाठी योग्य वेळी कीटकनाशकांचा वापर करता येतो.
एकाच वेळी गावांमध्ये पेरणी
एकाच गावात वेगवेगळ्या अंतराने पेरलेल्या पिकामध्ये गुलाबी बोंड आळीला दीर्घकाळ जगण्याचे साधन मिळते. त्यामुळे अशा परिस्थितीत एकाच वेळी शक्यतो कापसाची लागवड करावी. गुलाबी बोंड आळी चे व्यवस्थापन काढणीपर्यंत करावे लागते.
नक्की वाचा:खत विक्रीबाबत मोदी सरकारचा दिलासादायक निर्णय; शेतकऱ्यांचा होणार फायदा
Share your comments