भाजीपाला पीक म्हणून गवार हे महत्त्वाचे पीक आहे.हीपीके कोरडवाहू आणि बागायती म्हणून आणि पिकांची फेरपालट करण्यासाठी आंतरपिक म्हणून घेता येतात. या पिकांमुळे जमिनीची नत्राचा साठा वाढतो.
गवार पिकाच्या शेंगांमध्ये प्रोटिन्स, जीवनसत्व अ, ब,लोह,चुना यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.लेखात आपण गवारच्या काही सुधारित वाणांची माहितीघेऊ.
गवारच्या काही सुधारित जाती
- पुसा सदाबहार-ही जात राजस्थानातील स्थानिकजातीमधून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे. ही जात चांगले उत्पादन देणारी आणि सरळ वाढणारी आहे. उन्हाळी आणि खरीप हंगामात ही जात चांगली वाढते.या जातीच्या शेंगा पिवळसर हिरव्या रंगाची असून बारा ते तेरा सेंटीमीटर लांब मऊ तसेच कमी तंतुमय असतात. उन्हाळ्यात या जातीची पहिली तोडणी 45 दिवसांनी तर पावसाळ्यात 55 दिवसांनी होते.
- पुसा मोसमी- ही जात पावसाळी हंगामासाठी चांगली आहे. या जातीची झाडे सरळ या जातीची झाडे सरळ न वाढताभरपूर फांद्या येतात. या जातीच्या शेंगा मऊ,चकचकीत, हिरव्या आणि दहा ते पंधरा सेंटीमीटर लांबीचे असतात.उशिरा तयार होणाऱ्या या जातीच्या शेंगा 65 ते 80 दिवसांनी तोडणीस येतात.
- पुसा नव बहार- ही जात पुसा सदाबहार आणि पूसामोसमीया जातीच्या संकरातून विकसित केलेली आहे. या जातीच्या शेंगा ची प्रत पुसा मोसमी सारखे असून झाडे पुसा सदाबहार सारखी सरळ वाढतात.भरपूर उत्पादन देणारेही जात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी उत्तम आहे.
- या जातीचे हेक्टरी सरासरी उत्पादन 12 टनांपर्यंतमिळते.शेंगा 15 सेंटिमीटर लांब आणि जिवाणू मुळे होणाऱ्या करपा रोगाला प्रतिकारक वाण आहे.
- शरद बहार- महाराष्ट्रातील IC-11708 या स्थानिक वानातील एकाच झाडाच्या निवडी मधून या उत्कृष्ट असून बुटकी आणि झुडूप वजा वाढणारी जात आहे.या जातीच्या शेंगा 10 ते साडेबारा सेंटीमीटर लांबीच्या सरळ आणि गर्द हिरव्या रंगाचे असतात. बी पेरणी पासून 60 दिवसात शेंगा तोडणीसयेतात. तीन ते चार दिवसांच्या अंतराने शेंगांची तोडणी करावी या जातीचे दर हेक्टरी उत्पादन नऊटनांपर्यंत मिळते.बी लहान आणि पांढरा रंगाचे असते.
Share your comments