सोयाबीन महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून सोयाबीन लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. परंतु तरीही आपल्या देशात सोयाबीनची उत्पादकता आहे कमी आहे. या लेखात आपण सोयाबीन उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी आणि आंतरपीक पद्धती जाणून घेणार आहोत.
सोयाबीन आंतरपीक पद्धत
- पेरणी- कुठल्याही पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असावी लागते तीच परिस्थिती सोयाबीनची देखील आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी वाफशावर पूर्ण करावी. पूर्ण उगवण झाल्यानंतर गरज असेल तर पाणी द्यावे. पेरणी करताना ती 45×5 सेंटी मीटर अंतरावर करावी. कांदा बियाणे तीन ते पाच सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी.
खत व्यवस्थापन-
- सोयाबीनला हेक्टरी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद, तीस किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणी करताना द्यावे.
- जमिनीमध्ये जस्ताची कमतरता असेल तर 25 किलो झिंक सल्फेट पेरणी करताना द्यावे.
- उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून दहा किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी पेरणी वेळी द्यावे.
आंतरमशागत
सोयाबीन पिकाला सुरुवातीचे सहा ते सात आठवडे हे तन वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असतात. या काळामध्ये पीक तणमुक्त ठेवणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी 20 ते 30 दिवसांनी एक कोळपणी करावी व दुसरी कोळपणी 45 दिवसांनी करावी. गरज असेल तर एक ते दोन खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवावे.
सोयाबीन मधील आंतरपीक पद्धती
- कमी पावसाच्या व ज्या ठिकाणी दुबार पीक देणे शक्य नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीतून स्थिर उत्पन्न मिळू शकते.
- प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्यातरी एका पिकाचे उत्पादन हाती येते.
- आंतरपिकास सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश केला तर हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
- आंतरपीक पद्धतीमुळे या पिकामध्ये तन वाढ होत नाही.त्यामुळे पिकावर करो किडींचे प्रमाण कमी आढळते.
- तसेच जनावरांकरिता चांगला चारा उपलब्ध होतो. तुर+ सोयाबीन सारखे आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळींची कमतरता भरून निघण्यास मदत होईल.
सोयाबीन आंतरपीक प्रमाण
सोयाबीनमध्ये ज्वारी+ सोयाबीन+ तुर यांचे प्रमाण अनुक्रमे 6:2:1 किंवा 9:2:1 ओळी असे तीन स्तर आत आंतरपीक घेता येते. सोयाबीन हे मुख्य पिकाच्या दोन किंवा सहा किंवा नऊ ओळींनंतर तुर या आंतरपिकाची एकओळपेरणी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते.
सोयाबीन मधील काही अंतर पिके
- तुर + सोयाबीन( 1:2)
- कपाशी+ सोयाबीन (1:1)
- सोयाबीन + भुईमूग (1:6)
- सोयाबीन+ ज्वारी (1:2,2:2)
- सोयाबीन+ बाजरी(2:4)
Share your comments