शेतकरी पिकांवरील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. परंतु रासायनिक कीटकनाशकांच्या वापरावर विविध कारणाने मर्यादा येत आहेत. अशावेळी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. यामध्ये जैविक कीडनियंत्रणाला मोलाचे स्थान आहे.
पर्यावरणपूरक पद्धत असून यामध्ये नैसर्गिक जीवन चक्राचा डोळसपणे वापर केला जातो.जैविक कीडनियंत्रण यामधील महत्वाचे मित्र किटका विषयी बद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.
जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्र कीटक
- परभक्षी कीटक- एक कीटक यजमान किडी पेक्षा आकाराने मोठे, चपळ व सशक्त असून ते त्यांचे आयुष्य क्रमातएकापेक्षा जास्त यजमान किडींना भक्ष बनवतात.उदा.क्रायसोपर्ला, लेडी बर्ड बीटल, मायक्रोमस, सिरफीडअळी, बरं पक्षी कोळी इत्यादी.
- जैविक कीटकनाशके- परोपजीवी बुरशी/ बुरशीजन्य कीटकनाशके- निसर्गामध्ये काही बुरशी आहेत ज्या किडींवर उपजीविका करून व त्या किडींना रोग रस्ता करून मारतात व किडींचे नियंत्रण करतात, अशा बुरशी कीटकाकांवरील परोपजीवी बुरशी व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना बुरशीजन्य कीटकनाशके म्हणतात.बिव्हेरिया बॅसियाना,व्हर्टिसिलियम लेकॅनी, मेटारायझियम एनीसोप्लिइत्यादी प्रमुख परोपजीवी बुरशी जैविक कीड व्यवस्थापनामध्येमोठ्या प्रमाणात वापरली जातात.
- सूत्रकृमी नाशक परोपजीवी बुरशी- पॅसिलोमायसिस लीलॅसिनसही जैविक सूत्रकृमी नाशक बुरशी असून मुळावरील गाठी करणाऱ्यासूत्रकृमीच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
- परोपजीवी विषाणू- निसर्गात काही विषाणू आहेत जे किडींवर उपजीविका करून त्या किडींना रोगग्रस्तकरून मारतात व किडींचे नियंत्रण करतात. आशा विषाणूंना कीटकांवर ईल परोपजीवी विषाणू व त्या पासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना विषाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. घाटे आळी चा विषाणू, लष्करी आळी चा विषाणू, ऊसावरील खोड किडीचा ग्रेनुलिसीस विषाणू यासारखे परोपजीवी विषाणू जैविक कीड व्यवस्थापनामध्येमोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.
- परोपजीवी जीवाणु-बुरशी व विषाणू प्रमाणेच काही परोपजीवी जिवाणू असतात.जे किडींवर जगतात त्यामुळे किडींना रोगग्रस्तहोऊन मरतात. आशा जिवाणूंना कीटकांवरील परोपजीवी जिवाणू व त्यापासून तयार केलेल्याजैविक कीटकनाशकांचा जिवाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. हे जैविक कीटकनाशके कोबी वरील किडी व इतर पतंग वर्ग किडींच्या तसेच फळ भाज्यां वरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, लष्करी आळी इत्यादी किडींच्या प्रभावी नियंत्रणाकरिता मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
Share your comments