खरीप पिक नियोजन
प्रमुख खरीप पिकांचे पूर्व नियोजन कसे करावे व पिकांचे संकरित व सुधारित वाण याविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे.
- पीक व्यवस्थापन करतांना खालील मुद्यांचा अवलंब करावा.
- मृद व जलसंधारण करण्याकरिता बांध बंदिस्ती, ओघळ व नाल्याचे उपचाराची निगराणी व दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच करण्यात यावी.
- जमीन व पाऊसमानानुसार पीक पद्धती निवडावी.
- मध्यम ते भारी जमीनीत कापूस, तुर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.
- मध्यम जमिनीत सूर्यफुल, तुर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.
- हलक्या जमिनीत बाजरी, कुलथी, तीळ, कारळ, एरंडी यासारखी पिके घ्यावीत.
- पेरणी योग्य पाऊस होताच (७५ ते १०० मि. मी.) पिकांची पेरणी करावी.
- धुळ पेरणी करिता २५ टक्के क्षेत्रावर ज्वारी, मुग/उडीद सारख्या पिकाची निवड करावी.
- आंतरपिक पध्दतीमध्ये सं.ज्वारी+तुर (४:२), बाजरी+तुर (३.३), सोयाबीन+तुर (४:२), कापूस+उडिद/सोयाबीन (१:१) पीक पध्दतीचा अवलंब करावा.
- आवश्यकतेनुसार आपत्कालीन पीक नियाजन करावे.
- लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी, बियाण्याचे योग्य प्रमाण ठेवावे व बीज प्रक्रिया करावी.
- झाडांची योग्य संख्या ठेवावी. त्याकरीता दोन ओळीतील व दोन झाडात योग्य अंतर ठेवावे.
- पेरणी पूर्व मशागत, आंतरमशागत, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण व पीक संरक्षणाबरोबर, शेत पातळीवर जलसंधारणाकरीता परिस्थितीनुरुप योग्य मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा अवलंब करावा.
- अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे व एकात्मिक कीड व रोग नियंत्रण करावे.
- अतिवृष्टी दरम्यान शेतात साचलेले पाणी लवकरात लवकर शेताबाहेर काढण्यात यावे.
पिकांचे सुधारित आणि संकरित वाण
अ.क्र |
वाण |
पीक तयार होण्यास लागणारा कालावधी (दिवस) |
हेक्टरी उत्पादन (क्विंटल) |
प्रमुख वैशिष्टये |
|
सोयाबीन: अ) अति लवकर येणारा |
|||||
१ |
परभणी सोना (एमएयुएस -४७) |
८०-८५ |
२०-२५ |
झाडावर पिंगट लव असून पक्वतेनंतर शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. संकरित कापूस, ज्वारी आणि तुरीमध्ये आंतरपिकास योग्य, पक्वतेनंतर लवकरात लवकर काढणी करावी. पक्वतेनंतर शेंगा फुटण्यास बळी पडतो. |
|
ब) लवकर येणारा |
|||||
२ |
जवाहर (जेएस ३३५) |
९५-९८ |
२८-३० |
फुलांचा रंग जांभळा असून दाणा मध्यम आकाराचा असतो. पक्वतेनंतर ५-७ दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य. |
|
३ |
समृध्दी (एमएयुएस ७१) |
९३-९६ |
२८-३० |
फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य. |
|
४ |
शक्ती (एमएयुएस ८१) |
९७-९८ |
२५-३० |
फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य. |
|
५ |
एमएयुएस १५८ |
९५-९८ |
२६-३१ |
फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा फुटत नाही. खोडमाशीसाठी सहनशिल, आंतरपिकास योग्य. |
|
क) मध्यम उशिरा येणारे |
|||||
६ |
प्रसाद (एमएयुएस ३२) |
१०५-११० |
२५-३० |
फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा गुलाबी आहे. पीक पक्वतेनंतर १२-१५ दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. आणि शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये (१६०-१७० दिवस) आंतरपिकास योग्य. |
|
७ |
प्रतिकार (एमएयुएस ६१) |
९५-११० |
२५-३० |
फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर शेंगाचा रंग बदामी होतो. पक्वतेनंतर ८-१० दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये (१६०-१७० दिवस) आंतरपिकास योग्य. |
|
८ |
प्रतिष्ठा (एमएयुएस-६१-२) |
१००-११० |
२५-३० |
फुलांचा रंग लालसर असून लव तपकिरी रंगाचे आहे व दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर ८-१० दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. तांबेरा रोगास मध्यम प्रतिबंधक, आंतरपिकास योग्य. |
|
९ |
एमएयुएस-१६२ |
१००-१०३ |
२८-३० |
यंत्राव्दारे काढणीस उपयुक्त. तसेच शारीरीक पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा फुटत नाही. |
|
कडधान्य: अ) तूर |
|||||
१ |
बदनापूर-२ |
१६०-१६५ |
१०-११ |
मध्यम मुदतीचा, पांढरा दाणा असलेला, अंतर पिकासाठी योग्य. |
|
२ |
बीएसएमआर-७३६ |
१७५-१८० |
१५-१६ |
या वाणाच्या दाण्याचा रंग लाल असून मर आणि वंध्यत्व रोगास प्रतिकारक. सोयाबीन व उडीद अंतर पिकासाठी योग्य. |
|
३ |
बीएसएमआर-८५३ (वैशाली) |
१७०-१७५ |
१५-१६ |
मध्यम कालावधीचा, पांढरा दाणा असलेला, मर आणि रोग प्रतिकारक. फुलाचा रंग लाल व सोयाबीन व उडीद अंतर पिकासाठी योग्य. खते व पाण्यास योग्य प्रतिसाद. |
|
४ |
बीडीएन- ७०८ (अमोल) |
२००-२१० |
१६-१८ |
मध्यम कालावधीचा, लाल रंगाचा दाणा असून कमी पावसाच्या प्रदेशासाठी योग्य, मर रोग प्रतिकारक. |
|
५ |
आयसीपीएल-८७११९(आशा) |
२००-२१० |
१०-१२ |
उशिरा तयार होणारा, मर आणि वंध्यत्व रोगास प्रतिकारक, दाण्याचा रंग लाल. |
|
६ |
बीडीएन- ७११ |
१५०-१६० |
१६-१८ |
कमी कालावधीत तयार होणारा वाण, मर व वांझ प्रतिबंधक. |
|
ब) मूग |
|||||
१ |
बीएम -४ |
६०-६५ |
१०-१२ |
हा वाण विषाणूजन्य व भुरी रोगास प्रतिबंधक आहे. दाणे हिरवे, मध्यम. |
|
२ |
कोपरगाव |
६०-६५ |
९-१० |
दाणे टपोरे, हिरवे, चमकदार, भुरी रोगास बळी पडतो. |
|
३ |
बीपीएमआर- १४५ |
६५-७० |
१०-१२ |
दाणे हिरवे, चमकदार, टपोरे, भुरी रोगप्रतिकारक. खरीप व उन्हाळी हंगामात चांगला येतो. |
|
४ |
बीएम -२००२-०१ |
६५-७० |
१०-१२ |
एकाच वेळी काढणीस येणारा, टपोरे दाणे. |
|
५ |
बीएम-२००३-०२ |
६५-७० |
१२-१४ |
एकाच वेळी काढणीस येणारा, भूरीरोग प्रतिबंधक, टपोरा चमकदार. |
|
क) उडीद |
|||||
१ |
बीडीयु- १ |
७०-७५ |
११-१२ |
दाणे टपोरे, भुरी रोग प्रतिकारक, शेंग काळी चोपडी. |
|
२ |
टीएयु- १ |
७०-७५ |
१०-१२ |
दाण्याचा आकार मध्यम, भुरी रोग प्रतिकारक, शेंग काळी चोपडी. |
|
ड) चवळी |
|||||
१ |
सी- १५२ |
९५-१०० |
१०-११ |
दाणा बारीक व लाल. |
|
खरीप ज्वारी: अ) संकरित वाण |
|||||
१ |
सीएसएच-१४ |
११०-११५ |
३६-३८ |
हलक्या ते मध्यम जमिनीसाठी योग्य. कमी पावसाच्या भागासाठी शिफारस केलेला, लवकर येणारा संकरीत वाण, दाणा टपोरा व दाण्याची प्रत उत्तम, ताटांची उंची मध्यम व कडबा मध्यम प्रतीचा. |
|
२ |
सीएसएच-१६ |
११०-१२० |
४०-४२ |
मध्यम ते भारी जमिनीस आणि हमखास पर्जन्यमान असणाऱ्या भागासाठी योग्य. पावसात सापडल्यास दाणे काळे पडत नाहीत. |
|
३ |
परभणी साईनाथ |
११५-१२० |
४२-४५ |
दुहेरी उपयुक्त संकरित वाण,बुरशी रोगास प्रतिकराक्षम, कडब्याचे उत्पादन ११०-११५ क्वि./हे. उंच वाढणारे, ज्वारी आणि कडब्याची प्रत चांगली. |
|
ब) सुधारीत वाण |
|||||
१ |
पीव्हीके-४०० (एसपीव्ही- ९६०) |
११५-१२० |
३४-४० |
मध्यम ते भारी जमीन. हमखास पर्जन्यमान असणाऱ्या भागासाठी योग्य वाढणारी बुरशीसाठी रोग प्रतिबंधक, साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या समुहात मोडते. (१८ टक्के टी.एस.एस.) कडब्याची प्रत उत्तम, दाणा पांढरा टपोरा आणि शंखाकृती. |
|
२ |
सीएसव्ही-१५ (एसपीव्ही-९४६) |
११०-११५ |
३५-४० |
दाणे आणि कडबा (कडबा ११०-१२० क्विंटल/हेक्टर) यांचे अधिक उत्पादन देणारा वाण. उंच वाढणारा व भाकरीची प्रत उत्तम. |
|
३ |
पीव्हीके-८०१ (१३३३) (परभणी श्वेता) |
११५-१२० |
४०-५० |
मध्यम ते भारी जमिनीस योग्य, हा वाण संकरित वाणासारखा दिसतो. पावसात सापडल्यास इतर वाणाच्या तुलनेने या वाणाचे दाणे कमी काळे पडतात. उंची (६-७ फुट) संकरित वाणाइतकी असल्यामुळे प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा जमिनीवर लोळत नाही. सर्व खरीप वाणापेक्षा भाकरीची प्रत चांगली, कडबा चवदार, पौष्टिक व पचण्यास सुलभ, सरळ वाण असल्यामुळे शेतकरी स्वतःचे बियाणे स्वतः पुन्हा वापरु शकतो. |
|
४ |
पीव्हीके-८०९ |
११५-१२० |
४०-४५ |
मध्य ते भारी जमिनीस योग्य. अधिक दाणे आणि कडबा उत्पादन दुहेरी उपयुक्त वाण. काळया बुरशीस प्रतिकारक्षम. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम. |
|
बाजरी: अ) संकरित वाण |
|||||
१ |
जीएचबी-५५८ |
७५-८० |
३०-३५ |
उंची (१८०-१८५) से.मी. फुटव्याची संख्या ३ ते ५, कणसाची लांबी २२-२५ सेंमी. दाणा टपोरा एक हजार दाण्याचे वजन (१२ ग्रॅम), कडब्याचे उत्पन्न ५०-५५ क्वि./हे. उन्हाळयासाठी उपयुक्त वाण. |
|
२ |
सबुरी |
८५-९० |
३०-३५ |
कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे. फुटवे २-३, उंची १७०-२०० सेंमी. हा वाण मध्यम ते भारी जमिनीस योग्य. |
|
३ |
श्रध्दा |
७५-८० |
२५-३० |
कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे. फुटवे २-३, उंची १८०-१९० सेंमी. हलक्या व मध्यम जमिनीस्तव कमी मध्यम पावसासाठी योग्य वाण. |
|
४ |
एएचबी-१६६६ |
७५-८० |
३०-३५ |
या वाणाने प्रचलित संकर वाण सबुरीपेक्षा १५-२० टक्के दाण्याचे व २० टक्के कडब्याचे अधिक उत्पन्न दिलेले आहे. यापासून दाण्याचे उत्पन्न ३०-३५ क्विं/हे. व कडब्याचे ५०-६० क्वि./हे. गोसावी रोगास प्रतिकारक आहे. |
|
५ |
शांती |
८५-९० |
२५-२६ |
कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे. उंची १४५-१९० सेंमी. हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक असून दाण्याचा रंग राखी, कणीस घट्ट, दाणे टपोरे, महाराष्ट्रातील अवर्षण भागासाठी प्रसारीत. |
|
६ |
पीकेव्ही-राज |
८०-८५ |
२८-३० |
कडब्याचे उत्पन्न ५०-५५ क्वि./हे., हजार दाण्याचे वजन १२.० ग्रॅ. असून रोगास प्रतिकारक. |
|
ब) सुधारित वाण |
|||||
१ |
आयसीटीपी |
८५-९० |
२२-२५ |
(धान्य) ४०-४२ (कडबा) २ ते ३ फुटवे, लोळत नाही, मध्यम उंचीचा (१८०-१८५ सेंमी), कणसाची लांबी २०-२२ सेंमी, दाणा टपोरा (एक हजार दाण्याचे वजन ११-१२ ग्रॅ) दाण्याचा रंग करडा, कडब्याचे उत्पन्न ४० क्वि./हे. |
|
२ |
एआयएमपी-९२९०१ (समृध्दी) |
८५-९० |
२०-२५ |
कडब्याचे उत्पन्न ३५-४० क्वि./हे., दाण्याचा रंग हिरवा व टपोरा, भाकरीची गुणवत्ता उत्तम. गोसावी रोगप्रतिकारक व अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य. |
|
३ |
पीपीसी-6 (परभणी संपदा) |
८५-९० |
२५-३० |
कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे.,भाकरीची गुणवत्ता उत्तम. फुटवे २-२.५, गोसावी रोगप्रतिकारक व अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य. |
|
४ |
एबीपीसी-४-३ |
८०-८५ |
२७-३० |
कडब्याचे उत्पन्न २७-३० क्वि./हे., गोसावी रोगप्रतिकारक असून दाण्याचा रंग किंचित हिरवा आहे. |
|
पेरसाळ |
|||||
१ |
अंबिका |
११०-११५ |
१७-२० |
पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली, फुटवे जास्त आणि एकाच वेळी पक्व होतात. करपा रोगास कमी प्रमाणात बळी पडतो. कोरडवाहूसाठी योग्य. |
|
२ |
तेरणा (एमएयु-९) |
१००-१०२ |
१९-२२ |
वाणाची उत्पादन क्षमता अंबिका या वाणापेक्षा अधिक असून हा वाण अंबिकापेक्षा १० ते १२ दिवस लवकर तयार होतो. तांदुळाची प्रत उत्तम असून करपा रोगास कमी प्रमाणात बळी पडतो. कोरडवाहूसाठी योग्य. |
|
३ |
प्रभावती (परभणी-१) |
११५-१२० |
३५-४० |
मध्यम बुटका वाण. फुटवे प्रमाण चांगले. जमिनीवर लोळत नाही. दाणा मध्यम आणि सुवासिक. भारी काळया जमिनीत बागायतीसाठी योग्य, लोह कमतरता सहन करतो. पाणी व खतास उत्तम प्रतिसाद. |
|
४ |
सुगंधा |
११०-११५ |
३९-४४ |
बुटका वाण, ओलिसात उत्तम प्रतिसाद, दाणे सुवासिक व लांबट आकाराचे, करपा रोगास बळी पडत नाही. |
|
५ |
पराग |
१०५-११० |
४०-४२ |
मध्यम बुटका वाण, तांदळाची प्रत उत्तम, असून लोहद्रव्य कमतरतेस बळी पडत नाही. हा वाण प्रभावती व बासमती-३७० या संकरापासून पेशीसंवर्धनाचे तंत्र वापरुन तयार करण्यात आला आहे. |
|
६ |
परभणी अविष्कार |
११२-११५ |
३६-३९ |
मध्यम बुटका वाण, लोहद्रव्य कमतरतेस बळी पडत नाही. तांदूळ सुवासिक असून तांदळाची लांबी पराग व सुगंधी वाणापेक्षा जास्त आहे. बागायतीस उत्तम प्रतिसाद. |
|
७ |
टीजेपी-४८ |
११०-११५ |
२२-२४ |
मध्यम बुटका, सुवासिक, न लोळणारा वाण. |
|
कापूस: अ) देशी वाण |
|||||
१ |
परभणी तुराब (पीए-२५५) |
११०-११५ |
२२-२४ |
हा वाण सर्वसामान्य शेतक-यांना परवडणारा असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा धाग्याची लांबी २७-२८ मिमी. व रुईचा उतारा ३८ टक्के असून सुताचा नंबर ३५-४० एस आहे. |
|
२ |
विनायक (पीए-४०२) |
१५०-१६० |
१६-१८ |
बोंडाचे वजन २.५ ते ३ ग्रॅ. धाग्याची लांबी २५ ते २६ मिमी. सुताचा नंबर ४० एस असून रुईचा उतारा ३८ टक्के आहे. हा वाण दहिया रोगास प्रतिकारक्षम आहे. |
|
३ |
पीए-०८ |
१६०-१७० |
१७-१८ |
पीए-२२५ व पीए-४०२ पेक्षा १६ टक्के अधिक उत्पादन, तंतुविरहित सरकी, मध्यम बुटका वाण. किड रोगास सहनशील |
|
ब) अमेरिकन वाण |
|||||
१ |
रेणूका (एनएच ४५२) |
१६०-१७० |
१०-१२ |
हा अमेरिकन सरळ वाण बहुगुणी असून रोग व किडीस कमी बळी पडतो. रूईचा उतारा ४० टक्के असून पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या वाणात आहे. |
|
२ |
एनएच. ५४५ |
१६५-१७० |
१२-१५ |
हा वाण रेणूकापेक्षा अधिक उत्पादन देणारा असून रुईचे उत्पादन २० टक्के जास्त आहे. रोग व किडीस प्रतिकारक्षम |
|
३ |
यमुना (पीएच ३४८) |
१६५-१७० |
१६-१७ |
या वाणाचे एनएच-५४५ पेक्षा १५ टक्के उत्पन्न जास्त आहे. धाग्याची लांबी २७-२८ मिमी. असून रुईचा उतारा ३८ टक्के आहे. या वाणाची वैशिष्टये म्हणजे झाडाची वाढ उभट असून झाळ विरळ आहे. त्यामुळे हा वाण रोगराईस कमी प्रमाणात बळी पडतो व बोंडे चांगली पक्व होतात. या वाणाच्या बोंडाचे वनज ३.५ ग्रॅम असून बोंडे चांगली फुटतात त्यामुळे कपाशी वेचणीस सुलभ होते. |
|
क) अमेरिकन संकरित वाण |
|||||
१ |
एनएचएच-४४ |
१६०-१७० |
१९-२२ |
संकर-४ पेक्षा उत्पादन सरस, लवकर तयार होत असल्याने गहू किंवा भुईमुगासारखे दुबार पीक घेता येते. धाग्याची लांबी मध्यम (२४-२५ मिमी.) रस शोषण करणा-या किडींना प्रतिबंधक, बागायती आणि कोरडवाहूसाठी उपयुक्त, विविध हवामानात उत्पादनात स्थैर्य व पुनर्बहाराची क्षमता. |
|
२ |
गंगा (पी.एच.एच. ३१६) |
१६०-१७० |
१७-१८ |
एनएचएच-४४ पेक्षा १५ टक्के उत्पादन जास्त, धाग्याची लांबी एनएचएच-४४ पेक्षा ३ मिमी. ने आणि रुईचा उतारा ४ टक्के जास्त. मर रोगास प्रतिबंधक, झाडाची वाढ उभट व बोंडाचा आकार मोठा. |
लेखक:
प्रा. अपेक्षा कसबे (शास्त्रज्ञ, कृषिविद्या)
प्रा. सचिन सुर्यवंशी (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख)
कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर
02471-243275
Share your comments