
garlic crop can do prevention potato crops from disease and harmful insect
आता लसुन बटाटा पिकाला रोग आणि किडींपासून वाचवेल.बटाटा संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी दोन्ही पिके एकत्र घेऊन या दिशेने यशस्वी चाचणी करूनदोन्ही पिकांची एकत्रित लागवड करण्याचे नवे मॉडेल तयार केले आहे
शेतकऱ्यांसाठी याचा खूप फायदा होणार असून शेतकरी एकाच वेळी दोन पिके घेऊन दुप्पट नफा देखील कमावू होऊ शकणार आहे. लसून जमिनीत गंधक मिसळते आणि बटाटा पिकावर हल्ला करणाऱ्या कीटक आणि रोगांना प्रतिबंधित करते.
बटाटा आणि लसूण एकत्र शेतात पिकवण्याच्या पद्धती नुसार शेतकऱ्यांना एका ओळीत बटाटा आणि दुसर्या ओळीत लसुन पिकवावे लागते. यामध्ये बटाटा उत्पादनासाठी आवश्यक तेवढेच अंतर ठेवावे लागते. हा प्रयोग बटाट्याच्या कोणत्याही जातीवर करता येतो.
त्यामुळे बटाटे आणि लसुन उत्पादनात काही फरक पडत नाही.बटाटा पिकाचे नुकसान करणाऱ्या आणि उशिरा येणाऱ्या अनिष्ट रोगांचा सामनाकरण्यासाठी मध्यभागी लसणाचे पीक घेणे प्रभावी मानले जाते.लसुन बटाटा पिकावरील सर्व प्रकारच्या शत्रू कीटकांना वाढू देत नाही.
या संस्थेचे शास्त्रज्ञ अजूनही या प्रकारचे शेती बद्दल अधिक तथ्य गोळा करत आहे. यानंतर लसुन आणि बटाट्याच्या संयुक्त लागवडीसाठी कोणते वाण अधिक परिणामकारक ठरतील यावर ही परिस्थिती स्पष्ट केली जाईल.
या यशस्वी चाचणीनंतर देशातील बटाटा उत्पादकांना त्यांच्या शेतात बटाटा आणि लसूण लागवड अधिक फायदे मिळू शकते. या बाबतीत केंद्रीय बटाटा संशोधन संचालक डॉ. एन के पांडे म्हणतात की, बटाटा आणि लसुन यांची एकत्रित लागवड केल्याने शेतकरी बटाट्याचे पीक कीड आणि उशिरा येणाऱ्या रोगांपासून वाचवू शकतात.
या दिशेने संस्थेचे शास्त्रज्ञ अधिक तथ्य आणि डेटा गोळा करत असून यासंदर्भात फिल्ड ट्रायल सुरू आहे. हिमाचल प्रदेश मध्ये सफरचंदाच्या बागांमध्ये लसणाची लागवड करून रोग आणि कीटकांच्या नियंत्रणासाठीपद्धत वापरली जात आहे.सफरचंद बागातदार सफरचंदाच्या झाडाच्या खोडात लसुन वाढवतात.
सफरचंदाच्या झाडावरील रूट बोरर कीटक आणि धोकादायक सुरवंटाना रोखण्यासाठी उपयुक्त ठरते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:कांदा चाळीत साठवायचा आहे! तर 'हे' तीन तंत्रे राहू द्या कायम लक्षात,कांदा टिकेल दीर्घकाळ
Share your comments