शेती क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी मोदी सरकारने ‘मृदा आरोग्य कार्ड योजना’ (Soil Health Card Scheme) आणली आहे.याद्वारे शेतीसह तुमच्या गावातच तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता आणि पैसेही मिळवू शकता. या योजनेअंतर्गत गाव पातळीवर ‘मिनी सोईल टेस्टिंग लॅब’ सुरू केली जाणार आहे.येथे शेताच्या मातीची चाचणी केली जाते, ज्यापासून चांगली कमाई केली जाऊ शकते. याक्षणी देशात अशा काही लॅब आहेत. तर या रोजगारामध्ये बर्याच संभाव्यता आहेत. Soil Health Card Scheme
या प्रयोगशाळेत काय केले जाते?
गाव पातळीवर उभारल्या गेलेल्या या मिनी सॉईल टेस्टिंग प्रयोगशाळेमध्ये मातीच्या नमुन्याची चाचणी केली जाते. माती कशी आहे? त्यामध्ये कोणती कमतरता आहे? कोणते पीक चांगले येऊ शकते?याची तपासणी केली जाते.मातीचा नमुना घेण्यासाठी आणि चाचणी करून मृदा आरोग्य कार्ड देण्यासाठी सरकारकडून 300 प्रति नमुना देण्यात येत आहे.
सरकार कडून 3.75लाख अनुदान
ही लॅब साकारण्यासाठी एकूण पाच लाखांपर्यंत खर्च येतो. मात्र मृदा हेल्थ कार्ड या योजनेअंतर्गत सरकार 3.75 लाखांचे अनुदान देते. उर्वरित एक लाख पंचवीस हजारांची रक्कम तुम्हाला खर्च करावी लागते. Soil Health Card Scheme
अशी व्यक्ती उघडू शकते लॅब
या योजनेद्वारे 18 ते 40 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरुण ही प्रयोगशाळा उघडू शकतात. प्रयोगशाळा सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणाकडे अॅग्री क्लिनिक, कृषी उद्योजक प्रशिक्षण असलेल्या द्वितीय श्रेणीच्या विज्ञान विषयांसह मॅट्रिक असणे आवश्यक आहे. तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
लॅब सूरू करण्यासाठी या ठिकाणी करा संपर्क
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा किसान कॉल सेंटर ला देखील कॉल करून माहिती घेऊ शकता. तसेच शेतकरी किंवा इतर संस्थांना जर ही लॅब सुरू करायची असेल तर आपला प्रस्ताव जिल्ह्याचे कृषी उपसंचालक, सहसंचालक किंवा त्यांच्या कार्यालयात देऊ शकतात. तसेच agricoop.nic.in वेबसाइट
आणि soilhealth.dac.gov.in वर यासाठी संपर्क करु शकतात. तसेच किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधूनही अधिक माहिती मिळू शकते.
या गोष्टींकरिता करावा लागतो खर्च सरकार कडून मिळालेल्या पैशांपैकी अडीच लाख रुपये लॅब चालविण्यासाठी टेस्ट मशीन, रसायने व इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीवर खर्च करावा लागणार आहे. उर्वरीत संगणक, प्रिंटर, स्कॅनर, जीपीएस खरेदीवर एक लाख रुपये खर्च केले जातील. याद्वारे तरुणांना रोजगाराची उत्तम संधी प्राप्त होऊ शकते.
स्रोत- हॅलो कृषी
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments