- मांस उत्पादक
गिरीराजा,वनराजा,श्रीनिधी,कलिंगा ब्राउन,कुरोइलर
- अंडी उत्पादक
रौड आइलैंड रेड,ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प,देलहम रेड,स्वर्णधारा,ग्रामप्रिया,ग्रामश्री,मंजुश्री,ब्राउन लेगहॉर्न
- दुहेरी वापराच्या
डीपी / डीपी क्रॉस,सातपुडा,सह्याद्री,कावेरी,निकोबारी,आर आर
स्पेशल परपज
कड़कनाथ,सिल्की,असील,नेकेड नेक
वरील सर्व जाती भारतामध्ये उपलब्ध असून आपल्याकडील वातावरणामध्ये उत्तमरीत्या संगोपीत केल्या जाऊ शकतात.
2) कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे?
कोंबडीच्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर विशिष्ठ खाद्य द्यावे, जे सकस आणि पौष्टिक असेल.
तसेच खाद्याची योग्य साठवणूक आणि हाताळणी केल्यास त्याची कार्यक्षमता टिकून राहाते.
1 ते 21 दिवस – चिक स्टार्टर
एक दिवसांच्या पिलाना 21 दिवस पूर्ण होइ पर्यंत चिक स्टार्टर हे खाद्य द्यावे, ह्या अवस्तेत पिल्लांचि वाढ अत्यंत झपाट्याने होत असते.
प्रोटीन 18 ते 19 %
21 ते विक्री पर्यंत
जर पक्षी मांस उत्पादनासाठी ठेवले असतील, तर चिक फिनिशर द्यावे. चिक फिनिशरमुळे जलद वजन वाढ होते.
सोबत योग्य प्रमाणात जीवनसत्व आणि लिवर टॉनिक द्यावे
प्रोटीन 15 ते 16%
21 ते अंडी उत्पादन सुरु होई पर्यंत
जर पक्षी अंडी उत्पादनासाठी वाढवत असाल, तर तलंगाना पहिले 6 महीने ग्रोवर हे खाद्य द्यावे. ग्रोवरमुळे त्यांचे वजन जास्त न वाढता योग्य शारीरिक वाढ होईल.
प्रोटीन 15 ते 16 %
अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांना उच्च प्रोटीन आणि ऊर्जा युक्त आहार द्यावा. या आहाराला लेयर फीड असे म्हणतात.
सोबत 5% अतिरिक्त कॅल्शिअम आणि योग्य प्रमाणात लिवर टॉनिक द्यावे.
प्रोटीन 16 ते 18 %
3) कोंबड्यांना कोणत्या लसी दिल्या जातात ?
लसिकरण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे योग्य वेळी लसिकरण करावे.
1 दिवस मरेक्स HVT मानेतुन इंजेक्शन
7 दिवस रानीखेत / मानमोडी लसोटा डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
14 दिवस गमभोरो IBD डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
21 दिवस लसोटा बूस्टर पिण्याच्या पाण्यातून
28 दिवस गमभोरो बूस्टर पिण्याच्या पाण्यातून
35 दिवस देवी / फाउल पॉक्स चामडी खाली इंजेक्शन
अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवणार असाल, तर दर महिन्याला बूस्टर डोस द्यावेत.
4) गावरान कुक्कुट पालन करण्यासाठी किती जागा लागते ?
बंदिस्त डिप लीटर पद्धत
या पद्धति मधे पक्षी भुश्याच्या गादिवर सांभाळले जातात
मांस उत्पादनासाठी पक्षी सांभाळायचे असतील तर 1.5 ते 2 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवायचे असतील तर 4 ते 5 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
मुक्त संचार पद्धत असेल तर फ़क्त रात्रीच्या निवाऱ्या साठी बंदिस्त शेड असावे.
मांस उत्पादन – मांस उत्पादनासाठी पक्षी पाळायचे असतील तर 1 वर्ग फुट प्रती पक्षी जागा असावी.
तसेच कमीत कमी 8 ते 10 वर्ग फुट प्रती पक्षी मुक्त जागा उपलब्ध असावी.
मुक्त पद्धति ने अंडी उत्पादन घेत असाल तर 2 वर्ग फुट प्रती पक्षी जागा शेड मधे अपेक्षित आहे, आणि कमीत कमी 15 ते 20 वर्ग फुट जागा प्रती पक्षी मुक्त संचार उपलब्ध असावा.
5) कोंबड्यांचे उष्णते पासून रक्षण कसे करावे ?
कोंबड्यांना घाम येत नाही. कोंबड्या कुत्र्या प्रमाणे मोठ्याने श्वास घेऊन शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.
शेडच्या छतावर पांढरा रिफ्लेक्टर रंग मारावा, त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण होते.
शेडची रुंदी 30 फूटा पेक्षा जास्त नसावी. शेडची लांबी पूर्व पश्चिम असावी. शेडच्या भिंती जास्त उंच नसाव्यात.
पडदे नेहमी वर खाली करता यावेत त्यावर उष्मकाळात पाणी शिंपावे . मुक्त पद्धत असेल तर जमिनीवर पानी शिंपावे, ज्यामुळे गारवा रहातो.
मुक्त जागेत दाट सावली असणारी झाडे लावावीत. झाडे नसतील तर शेडनेट किंवा गवताच्या साह्याने कृत्रिम सावली पुरवावी.
कोंबड्यांना नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध असावे .
पक्ष्यांना वरचेवर ताण कमी करणारी औषध द्यावीत.
6) लीटर ची काळजी कशी घ्यावी
खालील पैकी जे आपल्याला स्वस्तात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याचाच लीटर म्हणून वापर करावा.
भाताचे तुस,लाकडाचा भूसा,शेंगाची टरफले,पोयटा माती किंवा पांढरी माती,चुना मिश्रीत माती
लीटर हे नेहमी कोरडे असावे किंवा ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.
लीटर योग्य वेळी बदलावे.लीटर वरचेवर हलवावे किवा स्क्रेपिंग करावे म्हणजेच उलटे पालटे करावे.लीटर मधे नेहमी 10 % चुना मिक्स करावा.अचानक रात्री लीटर ओले झाले तर 10 ते 15% चुना मिक्स करून चांगले हलवून घ्यावे आणि दुसऱ्या दिवशी बदलावे.लीटर चा वास येऊ लागताच बदलावे किंवा E M सोलुशनचा स्प्रे करावा लीटर मधून आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी.
7) अंडी उत्पादन कमी होण्याची प्रमुख कारणे काय आहेत?
कोंबड्यांचे वजन आटोक्यात न राहणे.
कोंबड्यांना योग्य ठिकाणी अंडी घालण्याची सवय न लावणे.
कोंबड्यांना योग्य प्रमाणात कैल्शियम आणि खनिजांचा पुरवठा न करणे.
दिवसातून 4 वेळा अंडी न गोळा करणे.
दिवसातून 16 तास सलग प्रकाश मिळू ना शकणे.
कोंबड्यांवर सतत ताण राहणे.योग्य प्रकारे कोंबड्यांना न हाताळने कोंबड्या आजारी असणे.
पौष्टिक आहार ना मिळणे.
8) पैदाशीसाठी कुक्कुट पालन करताना काय काळजी घ्यावी ?
पैदाशी साठी कुक्कुट पालन करत असाल तर नर मादी संख्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.
प्रति 8 ते 10 मादी मागे 1 या प्रमाणात कळपा मधे नर असावेत.नर हे अतिशय चपळ आणि रुबाबदार असावेत. तसेच आपल्या जातीची गुण वैशिष्ठे ठळक दाखवणारे असावेत.
नर आणि माद्या हे एकाच कळपा पासून जन्मलेले नसावेत.
काही काळाने नर बदलावेत.
माद्या ह्या सतत प्रजननासाठी उत्सुक असाव्यात.
9) कोंबडी अंडी देतेय की नाही हे कसे ओळखावे?
अंडी देणाऱ्या कोंबडी ची लक्षणे
अंडी देणारी कोंबडी नेहमी चंचल असते आणि सतत फिरत असते.डोक्यावरील तुरा हा मांसल आणि लाल भड़क असतो तसेच तूऱ्यावर चकाकी असते.कोंबडीच्या पिसांवर चकाकी असते.कोंबडी दुपारच्या विशिष्ट वेळी विशिष्ठ आवाजात ओरड़ते.कोंबडीचा मागील (गुदा/योनी) भाग हा सतत ओलसर आणि हालचाल करणारा असतो.
कोंबडी एकाजागी खुडूक बसून रहात नाही.
अंडी देणारी कोंबडी ही नेहमी खाद्य खाण्यास उत्सुक असते. अशी कोंबडी भरपूर पाणी पिते.
10) खुडूक कोंबडी कशी ओळखावी किंवा रवणीला कोणती कोंबडी बसवावी
जी कोंबडी 3 ते 4 दिवसापासून खुडूक बसली आहे, अश्या कोंबडीची रवणीला बसवून अंडी उबवण्यासाठी निवड करावी.अश्या कोंबडी खाली एखाद्ये अंडे द्यावे, जर ती कोंबडी ते अंडे पोटाखाली घेऊन 2 ते 3 दिवस बसली, तर ती योग्यरीत्या खुडूक आहे अस समजावे. त्यानंतर तिच्या खाली 15 ते 20 अंडी ठेऊन तिला रवणीला बसवावे.
रावणीला बसवताना एखादी बांबूच्या विनीची टोपली घ्यावी. त्यात भाताचे तुस किंवा लाकडाचा भूसा किंवा राख टाकावी. त्यावर अंडी ठेवून कोंबडी रवणीला बसवावी
संकलन -विनोद भोयर मालेगाव
प्रतिनिधी गोपाल उगले
Share your comments