लसूणाचे स्थानीक अनेक प्रकार आढळतात. त्यामध्ये जांभळा, फिक्कट लाल,गुलाबी व पांढरा रंगाचे बरेच वान आढळून येतात व त्यामध्ये पाकळ्यांच्या प्रमाण 16 ते 50 पर्यंत असते. लसणाच्या जामनगर, नाशिक, महाबळेश्वर, मदुराई या स्थानिक जाती आहेत.
लसणाच्या चांगले उत्पादन देणाऱ्या जाती
- गोदावरी- ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केली आहे. गड्डा मध्यम आकाराचा असून रंग जांभळा पांढरा, स्वाद तिखट, प्रत्येक गड्ड्यात सरासरी 24 पाकळ्या असतात. गड्डा मध्यम जाडीची असून जाडी 4.35 सेंटी मीटर व उंची 4.3 सेंटीमीटर आहे. या जातीचा कालावधी 140 ते 145 दिवसांचा आहे. या जातीचे सरासरी उत्पन्न शंभर ते दीडशे क्विंटल मिळते. ही जात साठवणूक इस योग्य आहे.
- फुले नीलिमा- ही जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विकसित केलेली आहे. या जातीचा घाट आकाराने मोठी, आकर्षक, जांभळ्या रंगाची असून ही जात जांभळा करपा, फुलकिडे, कोळी या रोग व किडीस मध्यम प्रतिकारक्षम आहे.
- फुले बसवंत- हा लसणाचा वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कांदा संशोधन योजना,पिंपळगाव बसवंत येथून निवड पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. या वानाचा गड्याचा रंग जांभळा असून पाकळ्या सुद्धा जांभळ्या रंगाचे आहेत. सर्वसाधारण एका गड्डयात 25 ते 30 पाकळ्या असून सरासरी गड्ड्याचे वजन तीस ते पस्तीस ग्रॅम आहे. सरासरी उत्पन्न 140 ते 150 क्विंटल मिळते.
- ॲग्री फाउंड व्हाईट- ही जात एन एच आर डी एफ नाशिक येथून प्रसारित करण्यात आली आहे. ही जात पांढरे गड्डे असणारी, स्वाद मध्यम तिखट, गड्डे आकाराने मोठे,घट्ट, जाडी चार ते साडेचार सेंटिमीटर वउंची साडेचार सेंटिमीटर असते. पाकळ्यांची संख्या 13 ते 18 च्या दरम्यान असते. ही जात लागवडीपासून 120 ते 135 दिवसांत काढणीस तयार होते. या जातीपासून हेक्टरी सरासरी उत्पादन 130 ते 140 क्विंटल मिळते. या जातीत रोग व किडींचे प्रमाण कमी असून ही जात साठवण करण्यास योग्य आहे.
- यमुना सफेद- ही जात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान नाशिक या संस्थेने विकसित केलेली आहे. या जातीचा गड्डा आकाराने मोठा, जाडी 5.6 सेंटीमीटर, उंची साडेपाच ते सहा सेंटीमीटर, गड्डा घट्ट, पांढरा, पाकळ्यांची संख्या पंधरा ते सोळा असून त्या जाड असतात. ही जात भारतात सर्वत्र लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न 150 ते 175 क्विंटलमिळते.
6-जी-282- ही जात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान नाशिक येथून प्रसारित करण्यात आली आहे. या जातीचे गाठी पांढरा रंगाचा असून मोठ्या आकाराचे,गड्ड्यामध्ये 15 ते 16 पाकळ्या असतात. या जातीपासून 175 ते 200 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळते. तसेच ही जात निर्यातीसाठी उपयुक्त आहे.
7-यमुनासफेद-1- ही जात एन एच आर डी एफ येथून प्रसारित करण्यात आली आहे. या जातीचे गाठी पांढऱ्या रंगाच्या असून सरासरी उत्पन्न 150 ते 175 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
8-यमुनासफेद-2-( जी-50)- या जातीचे गड्डे आकर्षक पांढऱ्या, प्रति गड्ड्यात 35 ते 40 पाकळ्या असतात. या जातीचे सरासरी उत्पन्न प्रति हेक्टर दीडशे ते दोनशे क्विंटल मिळते.
Share your comments