Agripedia

ज्या जमिनीमध्ये सातत्याने उसाची लागवड करण्यात येते अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केला जातो.

Updated on 29 April, 2022 1:16 PM IST

ज्या जमिनीमध्ये सातत्याने उसाची लागवड करण्यात येते अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केला जातो.

अशा प्रकारच्याजमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण खूप जास्त प्रमाणात झाल्यानेजमिनीमध्ये त्यांची कमतरता आढळते. त्यामुळे ऊस पिकातील कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन शिफारशीत मात्रेत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. ऊस पिकातील जोमदार वाढ आणि उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे आणि त्यांचे कार्य जाणून घेऊ.

 ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य आणि कमतरतेची लक्षणे

         ऊस पिकातील लोहाचे कार्य

1- हरितद्रव्य तयार करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

2- पानांचा रंग गडद हिरवा तयार होण्यास मदत होते.

3- इतर अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी मदत करते.

4- झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक.

      लोहाच्या  कमतरतेची लक्षणे

1- नवीन येणारी पाने पिवळी दिसतात व शिरा हिरव्या दिसतात.

2- वरील लक्षणे प्रथम वरील भागातील पानावर आढळून येतात.

3- पाने पांढरट होऊन शेवटी वाळून  जातात.

    जस्ताची ऊस पिकातील कार्य

1- प्रथिने व एन्झाइम्स निर्मितीसाठी आवश्यक घटक

2- पिकांच्या वाढ करणाऱ्या प्रेरकांचे वाढीसाठी आवश्यक

3- वनस्पती मध्ये इंडोल ऍसिटिक ऍसिड तयार होण्यासाठी ट्रीव्होफेन च्या निर्मितीची आवश्यक असते. त्यामुळे जस्त चा उपयोग होतो.

4- वनस्पतीमध्ये हार्मोन्स तयार होण्यास मदत करते तसेच प्रजनन क्रियांमध्ये आवश्यक.

    उसातील जस्त कमतरतेची लक्षणे

1- पानामध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसू लागतो व शिरा हिरव्या राहतात.

2- करपलेले ठिपके व तांबडे डाग पानाच्या शिरा, कडा व टोके यावर तसेच सर्व पानांवर विखुरलेल्या स्वरूपात दिसतात.

3- उसामध्ये कांड्या आखूड पडतात.

     ऊस पिकातील मॅग्नीज चे कार्य

1- प्रकाश संश्लेषण क्रियेत मदत करते.

2- जैविक दृष्ट्या  कार्यप्रवण असलेल्या पेशीजाला मध्ये इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध

 मॅग्नीजच्या कमतरतेची लक्षणे

1- पानामध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो.

2- मुख्य व लहान शिरा गडद किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात त्यामुळे पानावर चौकटी दार नक्षी दिसते.

     ऊस पिकातील तांब्याची कार्य

1- तसे पाहायला गेले तर तांब्याची गरज वनस्पतींना फार कमी लागते.

2- तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास वनस्पतींना अपायकारक ठरते.

3- हरितद्रव्य व प्रथिने तयार होण्यासाठी मदत.

4- पिकाला लोहाचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी मदत करते.

5- वनस्पतींचे श्वसन क्रियेचे नियमन करण्यासाठी आवश्यक.

    तांब्याच्या कमतरतेची लक्षणे

1- पानाच्या कडा गुंडाळ्या जाऊन पाने वाळून जातात.

2- वनस्पतीचे खोड मऊ व लवचिक बनते.

3- फुटव्यांची संख्या कमी होते व पानांवर हिरवे ठिपके दिसतात.

    बोरॉनची कार्य

1- कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्यांचे स्थलांतर होण्यास मदत करते.

2- नत्राचे शोषण करण्यास मदत करते.

3- पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत करते.

4- आवश्‍यकतेनुसार साखरेचे स्थलांतर घडवून येण्यास मदत.

5- वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक.

बोरॉनच्या कमतरतेचे लक्षणे

1- पाने ठिसूळ बनतात व गुंडाळली जातात.

2- उसाचा शेंडा पिवळा पडतो नंतर तो तांबूस काळा पडून वाळतो.

3- शेंड्याकडील कोवळ्या पानावर पाण्याचे लहान-लहान पारदर्शी ठिपके दिसतात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:के व्ही के म्हणजे शेतकरी तंत्रज्ञान यामधील दुवा.- श्री डाॅ अतुल पु कळसकर

नक्की वाचा:महाराष्ट्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! मिळणार 200 रुपयांचे अनुदान, मंत्रिमंडळ निर्णय

नक्की वाचा:ऊसातील हुमणी: मे ते ऑगस्ट या काळातील सातत्यपूर्ण प्रयत्न ठरतील ऊस पिकातील हुमणीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर

English Summary: dificiency symptoms of micro nutrients in canecrop and benifit of micro nutrients
Published on: 29 April 2022, 01:16 IST