भारतात आता शेतीयोग्य जमीन शेतकऱ्यांकडे कमी होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती हि जैसी ती असते
. पण अलीकडे अनेक शेतकरी परंपरागत पीकपद्धतीला फाटा देत औषधी वनस्पतीची लागवड करत आहेत आणि त्यातून मोठी कमाई देखील करत आहेत. अशाच कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देणाऱ्या औषधी पिकांपैकी एक आहे स्टिव्हियाचे पिक. स्टिव्हीया लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न प्राप्त करू शकतो, म्हणुन आज आपण स्टिव्हीया लागवडीविषयी जाणुन घेणार आहोत.
स्टिव्हीया विषयी अल्पशी माहिती
शेतकरी मित्रांनो स्टीव्हिया ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये असणारे अनेक प्रकारचे पोषक घटक हे मानवी आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे सांगितले जाते. स्टिव्हीया मध्ये दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपुर असतात, तसेच स्टिव्हीया मध्ये अनेक मिनरल असतात जसे की, कॅल्शियम, झिंक, लोह, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज इत्यादी. आणि हे मिनरल आपल्या आरोग्यासाठी खुपच फायदेशीर असतात.
स्टिव्हीयाचे सेवन हे डायबेटीस रुग्णांसाठी एक वरदान आहे. स्टिव्हीया हे खुप गोड असते आणि ह्याचे सेवन डायबेटीक पेशन्ट ने केल्यास देखील त्याना याचा काही विपरीत परिणाम होत नाही. हे आपल्या शरीरातील साखर नियंत्रित ठेवते. स्टिव्हीयाच्या या गुणांमुळे बाजारात याची मागणी हि सदैव बनलेली असते.
स्टिव्हीया लागवड करतांना ह्या गोष्टींची काळजी घ्या
»स्टीव्हियाची लागवड हि कलम पद्धतीने किंवा डायरेक्ट बियाणे टाकून केली जाते.
»स्टिव्हीयाचे कलम लावल्यानंतर किंवा बिया पेरल्यानंतर त्याला पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे लागवड केल्यानंतर गरजेनुसार ठराविक अंतराने योग्य प्रमाणात स्टिव्हीया पिकाला पाणी द्यावे लागते.
स्टिव्हीया पिकातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, 50% कोको-पीट आणि 50% गांडूळ खत (किंवा शेणखत) जमिनीत टाकावे असा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.
स्टिव्हीया लागवडीसाठी किती येतो खर्च
स्टीव्हिया ही एक औषधी वनस्पती आहे, जी सामान्यतः मानवी रोगांविरुद्ध वापरली जाते. याच्या लागवडीसाठी 1 लाख रोपे हे एका हेक्टरसाठी लागतात. ज्यासाठी आपल्याला 1 लाख रुपयापर्यंत खर्च हा येतो.
Share your comments