बटाटा लागवड तंत्रज्ञान
हंगाम- ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा ते नोव्हेंबरचा दुसरा पंधरवडा
जमीन - लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची, भुसभुशीत, कसदार व चांगले सेंद्रिय घटक असणारी मध्यम प्रतीची, रेतीयुक्त पोयट्याची जमीन या पिकास फायदेशीर.
जमिनीचा सामू 5 ते 6.5 च्या दरम्यान. सामू 6.5 च्या खाली असेल तर जमिनीतील स्फुरद, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही अन्नद्रव्ये झाडांना कमी प्रमाणात उपलब्ध होतात.
लागवडीच्या मुख्य पद्धती
1) सुधारित सरी-वरंबा पद्धत -
2) रुंद गादी वाफा पद्धत - यात तीन फूट रुंद वाफे तयार केले जातात. या वाफ्यावर दोन फूट अंतरावर बटाट्याच्या दोन ओळींत लागवड केली जाते. प्रत्येक वाफ्यावर दोन ओळींच्या मध्ये ठिबक सिंचनची एक नळी टाकली जाते. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वाराही लागवड आता केली जाते.
केंद्रीय बटाटा संशोधन संस्था, सिमला प्रसारित वाण
कुफरी पुखराज, कुफरी ज्योती, कुफरी लवकर, चिपसोना 1, 2 व 3, कुफरी सूर्या
बटाटा बेणे निवड
बेणे निरोगी, उत्तम दर्जाचे आणि करपा, मर रोगांपासून मुक्त असावे.
बेणे वजन 30 ते 40 ग्रॅम, मध्यम आणि समान आकाराचे असावे.
बीजप्रक्रिया - कार्बेन्डाझिम 25 ग्रॅम आणि इमिडाक्लोप्रिड (200 एसएल) 4 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 मिनिटे बेणेप्रक्रिया. त्यानंतर शिफारशीच्या कालावधीनंतर 2.5 किलो ऍझोटोबॅक्टर आणि 500 मि.लि. द्रवरूप ऍसिटोबॅक्टर प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून प्रति 20 क्विंटल बियाण्यास 15 मिनिटे बुडवावे.
- प्रक्रियेनंतर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.
खत व्यवस्थापन
लागवडीपूर्वी 15 ते 20 टन प्रतिहेक्टरी चांगले कुजलेले शेणखत किंवा हिरवळीच्या
खतांचा वापर
खतांची एकूण मात्रा- 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 120 किलो पालाश प्रतिहेक्टरी
लागवडी वेळी नत्राची अर्धी मात्रा, तर पालाश आणि स्फुरदाची पूर्ण मात्रा द्यावी.
नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर एका महिन्याने भर देण्यापूर्वी करावी.
कॅल्शियम अमोनियम नायट्रेटचा वापर करून नत्राची मात्रा दिल्यास उत्पादन चांगले मिळते.
स्फुरद उपलब्धतेमुळे बटाटा बेण्यास अंकुर फुटणे, झाडांच्या मुळांची वाढ, बटाटे पोसणे आणि साठवणक्षमता आदी बाबींवर चांगला परिणाम होतो. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर फायदेशीर आहे.
पाणी व्यवस्थापन
कमी कालावधीच्या (80 दिवस) जातींना कमी, तर जास्त कालावधीच्या (120 दिवस) जातींना जास्त पाणी लागते.
लागवडीनंतर त्वरित पहिले पाणी द्यावे. दुसरे पाणी लागवडीनंतर 4 ते 7 दिवसांनी द्यावे. ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करावा.
आंतरपीक- उसात हे आंतरपीक घेणे फायदेशीर आहे.
आंतरमशागत
जमिनीत पोसणाऱ्या बटाट्यावर माती झाकणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून ते चांगल्या प्रकारे पोसतात.
लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिली हलक्या प्रमाणात व दुसरी 45 ते 50 दिवसांनी माती लावावी.
या वेळी उर्वरित नत्राचा दुसरा हप्ता 60 किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे युरिया खताद्वारे द्यावा.
आवश्यकतेनुसार 3 ते 4 वेळा खुरपणी करावी.
एकात्मिक कीड व रोगांचे नियंत्रण करावे.
Share your comments