शेतकरी सध्या विविध पिके घेतात. काही पिके ही दीर्घ कालावधीचे असतात तर काही पिकाचा कालावधी हा कमी असतो. परंतु या कमी कालावधीच्या पिकांचा जर आपण विचार केला अशा पिकांसाठी होणारा खर्च हा कमी असतो परंतु बरीच पीके खूप जास्त प्रमाणात नफा देण्याची क्षमता ठेवतात. अशी पिके भाजीपालावर्गीय प्रकारात जास्त प्रमाणात आहेत.
थोडेसे योग्य व्यवस्थापन आणि नीट माहिती राहिली ना तर अशी पिके खूप चांगला नफा देऊन जातात. या लेखामध्ये आपण अशाच एका शॉर्ट टर्म परंतु खूप चांगला पैसा देणाऱ्या पिकांची माहिती घेणार आहोत.
कमी कालावधीत चांगले आर्थिक उत्पन्न देणारे चवळी पीक
चवळी हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असणारे कडधान्य वर्गीय पिक आहे. बाजारात बाराही महिने भरपूर मागणी असणाऱ्या या पिकाचा आहारात खूप प्रमाणात समावेश केला जातो. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात चवळी लागवड केली जाते. थोडेसे व्यवस्थापन आणि उत्तम जमिनीची निवड वगैरे छोट्या छोट्या गोष्टी या पिकांमध्ये चांगला आर्थिक नफा देऊन जातात.
नक्की वाचा:Agriculture News: 'या' दोन पिकांची मिश्र शेती सुरु करा, लाखोंची कमाई होणारं
1- जमिनीची निवड महत्त्वाची -या पिकासाठी जमिनीची निवड करताना ती मध्यम ते भारी,पाण्याचा उत्तम निचरा होईल पाणी तुंबणार नाही अशी जमीन योग्य ठरते. परंतु क्षारयुक्त किंवा पाणथळ, ओपन जमिनीत या पिकाची लागवड करणे टाळावे.
2- चवळी लागवड करण्याआधी शेताचे पूर्वमशागत-ज्या शेतामध्ये चवळीची लागवड करायची आहे त्या शेताची उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. एक हेक्टर लागवड करायची असेल तर त्यामध्ये पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगले कुजलेले द्यावे.
3- जास्त उत्पन्नासाठी पेरणीचा योग्य कालावधी- जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवडीयोग्य पाऊस झाला तर वाफसा आल्यावर पेरणी करणे योग्य ठरते.
एक हेक्टर लागवड करायचे असेल तर 15 ते 20 किलो बियाणे पुरेसे ठरते.पेरणी करताना दोन ओळींमध्ये 45 सेंटिमीटर अंतर ठेवणे गरजेचे असून दोन रोपातील अंतर दहा सेंटिमीटर ठेवा.
4- लागवडीआधी बिजप्रक्रिया रोगांना ठेवेल दूर- पेरण्याअगोदर एक किलो बियाण्यास दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम चोळावे. त्यानंतर अडीचशे ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धन10 ते 15 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
5- योग्य रासायनिक खतांचे नियोजन- या पिकाला 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद याप्रमाणे खताचे नियोजन महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकशे पंचवीस किलो डीएपी प्रति हेक्टर पेरणी करताना खत द्यावे.
6- आंतर मशागत ठरेल टर्निंग पॉइंट- पिक जेव्हा 21 ते 25 दिवसांचे होईल तेव्हा पहिली कोळपणी आणि 30 ते 35 दिवसानंतर दुसरी कोळपणी खूप महत्त्वाचे ठरेल. लागवडीनंतर 30 ते 35 दिवस पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे.
7- पाणी व्यवस्थापन म्हणजे हातात पिक-जमिनी जोपर्यंत पाण्याचा ओलावा असतो तोपर्यंत पिकाची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होत राहते.जेव्हा पीक फुलोरा अवस्थेत येते आणि दाणे भरायला सुरुवात होते तेव्हा पाण्याची कमतरता भासू देऊ नये.
जर असे झाले तर उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे या कालावधीमध्ये दोन ते तीन संरक्षित पाण्याच्या पाळ्या दिल्यास पिकाची वाढ चांगली होते व हातात देणारे उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने मिळते.
Share your comments