भाजीपाला वर्ग पिकांमध्ये कोथिंबिरीला विशेष मागणी असते. हे पीक देशातल्या सर्वच राज्यांमध्ये घेतली जाते.कोथिंबीर हे महत्त्वाचे पीक असल्यामुळेउन्हाळ्यामध्ये कोथिंबीर ला भरपूर मागणी असते. हे पीक एक लॉटरी पिक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोथिंबिरीला केव्हा काय भाव मिळेल हे सांगता येत नाही.
.सध्या मार्केटचा विचार केला तर महाराष्ट्रात काही बाजार समित्यांमध्ये कोथिंबिरीला एका जुडीला चक्क दीडशे रुपये भाव मिळाल्याचे बातम्या वाचण्यात आल्या. या लेखात आपण कोथिंबिरीच्या लागवड व सुधारित जाती विषयी माहिती घेणार आहोत.
कोथिंबीर लागवड
- कोथिंबीर पिकासाठी लागणारे हवामान आणि जमीन-कोथिंबीर या पिकाची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते. यामुळे पावसाचे प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबिरीची लागवड करता येते.परंतू उन्हाळ्यात जर तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबिरीची वाढ कमी होते. कोथिंबीर पिकासाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या ते भारी जमिनीत कोथिंबिरीचे पीक उत्तम येते.
कोथिंबिरीचे सुधारित वाण
- कोकण कस्तुरी- कोकण कस्तुरी हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून 2013 मध्ये प्रसारीत करण्यात आली. ही जात अधिक सुगंध देणारी व पानांची संख्या जास्त असणारी ही जात अधिक उत्पादन देणाऱ्या हिरव्या पानांसाठी तसेच रोग व किडींपासून मुक्त राहून रब्बी आणि उन्हाळी लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
- को-1- हे वाण तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेले असून या वाणाचे 40 दिवसात हेक्टरी दहा टन कोथिंबिरीचे उत्पादन मिळते.
को-1 कोथिंबीरीची लागवड पद्धत
या कोथिंबीरीच्या लागवडीसाठी शेतात उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी. जमीन चांगली भुसभुशीत करून तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट गादीवाफे करून घ्यावेत. प्रत्येक वाक्यात आठ ते दहा किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्यावे. वाफे सपाट करून त्यात बी एक सारखे पडेल या बेताने फेकून द्यावे.
तसेच उन्हाळी हंगामात पेरणीपुर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावे.वाफ्यात ओलावा आल्यावर बियाणे पेरावे. कोथिंबीरीच्या लागवडीसाठी हेक्टरी 60 ते 70 किलो बी लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर चांगली उगवण होण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्यात. यासाठी धने लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे. तसेच पेरणीपूर्वी बी 12 तास पाण्यात भिजत ठेवाव आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. त्यामुळे उगवण 15 ते 20 दिवस दिसत असून कोथींबीरीच्या उत्पादनात वाढ होते.
खत व्यवस्थापन
या कोथिंबीर वानाच्या पिकाच्या चांगल्या आणि त्याच्या दरवाढीसाठी बी पेरणी करताना हेक्टरी 10 ते 12 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. कोथिंबीरीच्या पिकाला पेरणीच्या वेळी 50 किलो 15:15:15मिश्र खत द्यावे.
पीकउगवून आल्यावर 20 ते 25 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र द्यावे.अधिक उत्पादन घेण्यासाठी तीन बाय दोन मीटर आकाराच्या वाफ्यात लागवड करावी.कोथिंबिरीला पाणी जास्त लागत असल्यामुळे पाच सहा दिवसांनी पाणी देत राहावे. अशा प्रकारे शेतकरी आपल्या पिकात वाढ करून अधिकचे उत्पादन घेऊ शकतात.
Share your comments