मिरची हे पीक महाराष्ट्रात बहुतांशी बऱ्याच भागात लावण्यात येते. रेसिपी का जर आपण तंत्रज्ञानाचा व्यवस्थित वापर केला त्यातून चांगले उत्पादन मिळू शकते. परंतु मिरची उत्पादन ची गमकहे तिच्या रोपवाटिकेमध्ये असते.रोपवाटिकेत तयार होणारे रोपे जर सुदृढ आणि निरोगी असतील तर भविष्यात येणारे मिरची पीक हे सुदृढ आणि निरोगी असते व त्यातून चांगले उत्पादन मिळते. या लेखात आपण मिरचीची रोपवाटिका कशी तयार करावी व रोपवाटिकेचे कसे व्यवस्थापन करावे या बाबतीत माहिती घेणार आहोत.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः मिरची रोपवाटिका तयार केली तर त्याचे दोन प्रामुख्याने फायदे आहेत.
- रोपवाटिका तयार करताना जर स्वतः तयार केली तर आपल्याला हव्या त्या जातीची व वेगवेगळ्या प्रकारचे बी वापरता येते. परंतु रोपवाटिकेत वेगळ्या प्रकारचे बी वापरताना ते आपल्याला ओळखण्यासाठी योग्य प्रकारे मार्किंग करावी.
- आपण स्वतः तयार केलेल्या रोपवाटिकेतली रोपे निरोगी ठेवायची काळजी आपण स्वतः घेतो त्यामुळे ते रोपे निरोगी असतात. नर्सरीतून आणलेल्या रोपांमध्ये एखादा शेतात नवीन रोग येऊ शकतो पण तसा धोका स्वतः तयार केलेल्या रोपवाटिकेत सहसा नसतो.
मिरची रोपवाटिका तयार करताना घ्यायची काळजी
मिरचीची रोपवाटिका तयार करण्याचे ठिकाण थोडे उंचावर असावे जेणेकरून पाणी साचून मर होणार नाही. जेथे रोपवाटीका आहे त्या ठिकाणी सावली येणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या जमिनीत हराळी किंवा लव्हाळा याप्रकारचे तण असेल अशा जमीन रोपवाटिकेसाठी अजिबात वापरू नये. गादीवाफ्यावर रोपवाटिका टाकायचे असल्यास मातीची खोल नांगरट करून त्याला कुळवाच्या दोन पाळ्या देऊन माती भुसभुशीत करावी. तयार जमिनीचा उतार पाहून तीन बाय एक मीटरचे गादीवाफे तयार करावे. पेरणीपूर्वी प्रत्येक गादी वाक्यात 30 ग्रॅम ब्लायटॉक्स, तीस ग्राम हु्मॉल गोल्ड, तीस ग्राम हूमनासुर व बारा किलो चांगले कुजलेले शेणखत एकत्र करून मिसळावे.
एका हेक्टरसाठी जवळ जवळ एक किलो बियाणे पुरेसे होते. बियाणी टाकण्यापूर्वी त्याच्यावर तीन ग्रॅम थायरम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर दहा सेंटिमीटर ठेवून एक सेंटिमीटर खोलीवर बियांची पातळ पेरणी करावी. बीयाने टाकल्यानंतर त्यावर बारीक मातीने ते बियाणे झाकावे व बियाण्याची उगवण होईपर्यंत आच्छादनाने झाकावे. सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे.
त्यानंतर लोक पाणी दिले तरी चालते. रोप टाकून बारा दिवस झाल्यानंतर दोन ओळींमध्ये एक सेंटीमीटर खोलीपर्यंत खुरप्याने चर पाडून प्रत्येक वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम फोरेट पेरून लगेच पाणी द्यावे.
रोपवाटिकेत बियाणे टाकल्याच्या तीस दिवसांनी प्रत्येक वाक्यात दहा ग्रॅम युरिया व दहा ग्रॅम दाणेदार कॅलनेट एकत्र करून दोन ओळीत नाली पाडून द्यावे. लगेच मातीने झाकून घ्यावे.
फुलकिडे व करपा रोगापासून रोपांचे संरक्षण करणे हे फार गरजेचे असते त्यासाठी बारा मिली नुवाक्रोन अधिक 25 ग्रॅम डायथेन किंवा फुलकिडे किंवा माव्यासाठी इमिडाक्लोप्रिड फवारले तरी चालते. दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. सोपे तयार होण्यासाठी साधारणतः चार ते पाच आठवडे लागतात. लागवडीच्या वेळी जर रोपांची उंची जास्त असेल तर पुनर्लागवडीच्या अगोदर शेंडे कापून घ्यावेत जेणेकरून फांद्यांचा विकास होतो.
Share your comments