1. कृषीपीडिया

उसाची पाचट! पाचट आच्छादनाचे फायदे, अशा पद्धतीने करावा पाचटाचा वापर

जर ऊस पाचटचा विचार केला तर एका हेक्ट2र क्षेत्रामधून आठ ते नऊ टन पाचट मिळते. ऊस पाचट मध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात. जमिनीच्या सुपीकतेसाठी व पिकांना उपयुक्त आहेत. त्यामध्ये 0.5टक्के नत्र,0.2 टक्के स्फुरद,0.7 ते 1.0 टक्का पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते.या उसाच्या पाचटाचे अनेक उपयोग आहेत.या लेखात आपण ऊस पाचट आच्छादनाचे फायदे व तिचा वापर कसा करतात याबद्दल माहिती घेऊ

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
paachat

paachat

जर ऊस पाचटचा विचार केला तर एका हेक्‍टर क्षेत्रामधून आठ ते नऊ टन पाचट मिळते. ऊस पाचट मध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात. जमिनीच्या सुपीकतेसाठी व पिकांना उपयुक्त आहेत. त्यामध्ये 0.5टक्के नत्र,0.2 टक्के स्फुरद,0.7 ते 1.0 टक्का पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते.या उसाच्या पाचटाचे अनेक उपयोग आहेत.या लेखात आपण ऊस पाचट आच्छादनाचे फायदे व तिचा वापर कसा करतात याबद्दल माहिती घेऊ

उसाची पाचट आच्छादनाचे फायदे

  • ऊसपाचट आच्छादनामुळे जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व ओला वा जास्त काळ टिकतो. पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते.
  • आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तण नियंत्रणावर चा खर्च वाचतो. सेंद्रिय पदार्थां वाढून जमिनीची जलधारणशक्ती व भौतिक गुणधर्म सुधारतात.
  • यामध्ये खते पहारीने दिली जातात. खतांचा ऱ्हास रोखला जातो. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होताना त्यातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
  • पाचट कुजण्याची या प्रक्रियेमध्ये सूक्ष्म जिवाणू, गांडूळे,विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीचे प्रमाण वाढल्याने उसाची चांगली वाढ होते.
  • जमिनीचे तापमान थंड राहून मुळांची वाढ भरपूर होते व उन्हाळ्यातही पिकाला उन्हाचा त्रास होत नाही.
  • सेंद्रीय पदार्थ कुजण्याची सताना त्यातून कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडतो.वनस्पतीला कर्ब ग्रहणाच्या क्रियेसाठी हा कार्बन डाय-ऑक्साइड वायू लागतो. हवेमध्ये असलेल्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा शेतात त्याचे प्रमाण वाढून पिकाचा कर्ब ग्रहणाचा वेगही वाढतो व उसाची वाढ जोमदार होते.

ऊस पाचट चा वापर कसा करावा?

  • ऊस तोडणी वेळी पाच ओळीत न लावता जागीच राहू द्यावे.
  • शेतात एखाद्या ठिकाणी राहिलेला पाचटाचा ढीग पसरवून घ्यावा.
  • उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत. गुडघ्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन जोमदार कोंब येतात.
  • बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत.जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो.असे फुटवे जोमदार असून फुटव्यांची एकूण संख्या वाढते.बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीवरील कांडी पासून डोळे फुटून कमजोरफुटवेयेतात.
  • बुडख्यांच्या छाटणीनंतर बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी त्वरित कार्बनडेंझिमएक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्‍टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन समप्रमाणात पसरून टाकावे.
  • त्यानंतर उसास पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोचण्यास वेळ लागत असला तरी सर्वत्र पाणी बसेल याची काळजी घ्यावी
  • जमीन ओली असताना पाचट पायाने दाबून घ्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावी. जनावरांच्या पायाने पाचट थांबण्यास मदत होते वया पाचटाचा मातीशी संपर्क येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते.
  • ऊस तोडणी यंत्र आणि तोडणी केली असल्यास बुडख्यावरील पाचट बाजूलाकरणे किंवा बुडखे छाटणी ही कामे करावे लागत नाहीत. या यंत्राने पाचटाचे लहान तुकडे होऊन जमिनीवर समप्रमाणात हलका पाचटाचा थर तयार होतो.
English Summary: cane remnants is useful for cane crop and nutritional ingrediants for land Published on: 04 November 2021, 02:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters