काळी मिरी एक मसाला पीक असून त्याची लागवड स्वतंत्रपणे करता येते. कोकणामध्ये लागवड करायची असेल तर नारळ व सुपारीच्या बागेमध्ये मिश्र पीक म्हणून देखील लागवड करता येते. काळी मिरी या पिकासाठी हवामानाचा विचार केला तर 16 ते 38 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
तसेच हवेतील आद्रता 60 टक्क्यांपेक्षा जास्त असावी. जमीन हे पाण्याचा उत्तम निचरा होणारी निवडावी. जमिनीचा आमलं जास्त असेल तर अशी जमीन निवडू नये. पावसाळ्यामध्ये जमिनीत वारंवार पाणी साचत असेल तर अशी जमीन अजिबात निवडू नये.
काळी मिरीचे लागवड तंत्र
1- मिरची स्वतंत्रपणे लागवड करायची असेल तर ती तीन बाय तीन मीटर अंतरावर बिन काटेरी पांगारा, सिल्वर ओक, भेंड किंवा मँजियम इत्यादी झाडांची मिरी लागवडीपूर्वी किमान सात ते दहा महिने आधी लागवड करावी.
2- जर नारळ व सुपारी बागेत मिश्रपीक म्हणून मिरी लागवड करायची असेल तर नारळाच्या बागेत साडेसात मीटर बाय साडेसात मीटर आणि सुपारीच्या बागेत 2.7 बाय 2.7 मीटर अंतर असावे.
3- परस बागेमधील फणस, कोकम, आंबा तसेच आईन ही त्याची झाडांवर देखील मिरची लागवड करता येते. परंतु या ठिकाणी किमान 50 टक्के सूर्यप्रकाश जास्त गरजेचे आहे.
4- मिरीची लागवड ही पावसाळा संपण्याच्या शेवटी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करावी.
5- आधाराच्या झाडापासून किमान 45 सेंटिमीटर ते एक मीटर अंतर सोडून 60 बाय साठ बाय 60 सेंटिमीटर आकाराचे खड्डे पूर्व व उत्तर दिशेला खोदावेत.
6- या खड्ड्यांमध्ये मुळ्या फुटलेल्या मिरीची दोन छाटकलमे प्रत्येक झाडाजवळ लावावेत.
7- वेली जवळ पावसाचे पाणी साचू नये म्हणून मातीची भर विहिरीजवळ द्यावी व वेलीला आधारासाठी काठी लावावे.
मिरी पिकाचे व्यवस्थापन
1- पाणी पुरवठ्याची सोय करण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा अवलंब करावा.
2- पूर्ण वाढलेल्या एका मिरीच्या झाडाला तिसऱ्या वर्षापासून 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, 300 ग्रॅम युरिया, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 250 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश देणे आवश्यक आहे. या पिकाला खताची मात्रा वर्षातून दोनदा एक ऑगस्ट आणि दुसरे फेब्रुवारी महिन्यात विभागून द्यावी.
3- काळीमिरी पिकास भोवती सातत्याने पाने, गवत, आधारासाठी ज्या झाडाचा वापर केलेला असतो त्या झाडाची गळालेली पाणी यांचा आच्छादनासाठी वापर करावा.
4- आधाराच्या झाडावर मिरीच्या वेलांना चढेपर्यंत सैल बांधावे.
5- जलद व हळुवार मर इतर रोगांपासून रक्षण करण्यासाठी पावसाळा सुरू होताच संपूर्ण वेलावर आणि त्यानंतर 20 दिवसांच्या अंतराने दोन वेळा एक टक्का बोर्डो मिश्रण फवारावे. तसेच दहा टक्के बोर्डो पेस्ट एक मीटर उंचीपर्यंत वेलीवर लावावे.रोगट पाने व मेलेल्या वेली मुळासह काढून टाकाव्यात.
काळी मिरीची काढणी आणि उत्पादन
1- काळी मिरीची एकदा लागवड केली तर तीन वर्षानंतर उत्पादन सुरू होते. या पिकाला मे आणि जून महिन्याच्या दरम्यान तुरे येतात तर जानेवारी ते मार्च या कालावधीत घोस काढण्यासाठी तयार होतात.
2- घोसा मधील एक ते दोन मनी पिवळा अगर नारंगी रंगाचे झाल्यानंतर त्या वेलीवरील सर्व घोस काढावेत.काढलेल्या घोसा तील मिरीचे दाणे वेगळे करावेत आणि हे वेगळे केलेले दाणे उकळत्या पाण्याची प्रक्रिया करून उन्हात वाळवावे. या पद्धतीत मिरी दाणे वाढण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवून काढावेत. यामुळे मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसात वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो व दाण्याची प्रत सुधारते.
3- 100 किलो हिरव्या मिरी पासून सुमारे 33 किलो काळीमिरी मिळते.
4- मिरी पासून पांढरी मिरी देखील तयार करतात यासाठी पूर्ण पक्व झालेले दाणे उकळत्या पाण्यात 25 ते 30 मिनिटे उकळतात किंवा वाफवतात नंतर ते पलपिंग यंत्रामध्ये घालून त्यांची वरची साल काढली जाते.
साल काढल्यानंतर दाणे वाळवतात व पांढऱ्या मिरज चा उतारा सुमारे 25 टक्के इतका येतो.( ॲग्रोवन)
महत्वाच्या बातम्या
Share your comments