कारली हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात हे पीक निघते. कारल्या मध्ये नर व मादी फुले वेगवेगळी परंतु एका झाडावर लागतात. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलीला भरपूर मागणी असते.
महाराष्ट्रातील बाजारपेठ आणि निर्यातीचा विचार केला तर नऊ ते दहा इंच लांबीचे कारली अधिक प्रमाणात खपतात. जर तुम्हाला कारल्याची लागवड करायची असेल तर या लेखात आपण कारल्याच्या लोकप्रिय अशा काही वाना बद्दल माहिती घेऊ.
कारल्याचे लोकप्रियवाण
- हिरकणी-फळे गडद हिरव्या रंगाची असतात. फळांची लांबी 15 ते 20 सेंटिमीटर असते तसेच फळे लांब व काटेरी असतात. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 120 क्विंटल एवढे मिळते.
- फुले ग्रीन गोल्ड-फळे गडद हिरव्या रंगाच्या असतात.25 ते 30 सेंटिमीटर लांब व काटेरी असतात. यापासून हेक्टरी 230 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
- फुले प्रियंका- या संकरित जातींची फळे गर्द हिरवी, वीस सेंटीमीटर लांब व भरपूर काटेरी असतात. ही जात खरीप व उन्हाळी लागवडीस योग्य आहे. ही जात केवडा या रोगास बळी पडत नाही.सरासरी उत्पादन 200 क्विंटल प्रति हेक्टरी आहे.
- कोकण तारा-फळे हिरवी, काटेरी व 15 सेंटिमीटर लांबीची असतात. फळे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर असतात. निर्यातीसाठी अशी फळे योग्य असतात.सरासरी उत्पादन 15 ते 20 टन प्रति हेक्टर आहे.कोकण विभागात या जातीच्या लागवडीची शिफारसआहे.
काही खासगी कंपन्यांच्या लावण्या योग्य जाती
- महिको व्हाईट लॉन्ग- लागवडीपासून पंच्याहत्तर ते 78 दिवसात पीक काढण्यास तयार होते. फळाचा रंग पांढरा, साल मध्यम जाड व भरपूर शिरा असून फळाची लांबी 9 ते 12 इंच असते.
- महिको ग्रीन लॉंग- फळाचा रंग गडद हिरवा व टोकाकडे फिक्कट असूनइतर वैशिष्ट्ये महिको व्हाईटलॉंग प्रमाणेच आहेत.
- एम.बी.टी.एच.101-50 ते 55 दिवसांत पीक तयार होते. फळाचे सरासरी वजन 65 ते 70 ग्रॅम असून फळाची लांबी अठरा ते वीस सेंटीमीटर असतात. फळे गडद हिरव्या रंगाची, चांगल्या शिरा असलेली जात आहे.एकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
- एम.बी.टी.एच.102-55 ते 60 दिवसांत पीक तयार होते.फळाचे सरासरी वजन 100 ते 120 ग्रॅम भरते. फळांचा रंग पांढरा असून फळे तीस ते पस्तीस सेंटीमीटरलांबव बारीक असतात.एकरी 12 ते 14 टन उत्पादन मिळते.
Share your comments