सध्या रब्बी हंगाम तोंडावर आला आहे.त्यामुळे रब्बीहंगामाची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगामामध्ये गहू हे प्रमुख पीक आहे. आपल्या भारतात बहुतांशी रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली जाते.गव्हाचे चांगले उत्पादन मिळावे यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर उत्पादन चांगले मिळू शकते. याबाबत यालेखात माहिती घेऊ.
गव्हाच्या सुधारित जातींची निवड
- बागायती आणि वेळेवर पेरणी करण्यासाठी डीबीडब्ल्यू 303, डब्ल्यूएच 1270,पीबीडब्ल्यू 723 या जातींची पेरणी करणे आवश्यक आहे.
- बागायती आणि उशिरा पेरणी साठी डीबीडब्ल्यू 303,डीबीडब्ल्यू 71,पीबीडब्ल्यू 771, डब्ल्यूएच 1124,डीबीडब्ल्यू 90 आणि एचडी 3059 या जाती उपयुक्त आहेत.
- उशिरा पेरणी साठी एचडी 3298 जातीची निवड करता येते.
- मर्यादित सिंचन आणि वेळेवर पेरणीसाठी डब्ल्यूएच 1142 जातीची लागवड करावी.
गव्हाची पेरणीची योग्य वेळ
- बागायती,वेळेवर पेरणी 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान योग्य असते.
- बागायती, उशिरा पेरणी हे 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान
- उशिरा पेरणी 25 डिसेंबर नंतर
गव्हाच्या लागवडीची तयारी
गहू पेरणी चे 15 ते 20 दिवस आधी क्षण चार ते सहा टन प्रति एकर या दराने मिसळावे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
गव्हासाठी सिंचन व्यवस्थापन
गव्हाचे चांगले उत्पादन येण्यासाठी पाच ते सहा वेळा सिंचन करणे आवश्यक आहे. परंतु जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि वनस्पतींची गरज यानुसार सिंचनाचे व्यवस्थापन केले पाहिजे.
गहू पिकावरील रोग आणि कीड व्यवस्थापन
- शेतकर्यांनी पेरणी करताना मान्यताप्राप्त आणि रोग आणि कीड प्रतिरोधक वाणाची पेरणी करावी.
- नत्राचा समतोल प्रमाणे वापर करावा.
- प्रमाणित बियाणे बिजजन्यसंसर्गाच्या व्यवस्थापनासाठी वापरावे.
- तसेच पिवळ्या गंज रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रोपिकॉनाझोल(25 इसी) किंवा टेबुकोनाझोल (250 इसी ) याची फवारणी 0.1 टक्के(1.0 मिली / लिटर )द्रावणाची फवारणी करता येते.
गव्हाची काढणी
जेव्हा गव्हाचे दाणे पिकल्यानंतर कडक होतातआणि आद्रतेचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा कमी असते तेव्हा कम्बाईन हार्वेस्टरने कापडी करता येते.( स्त्रोत-HELLO कृषी)
Share your comments