Agripedia

मिरची लागवडीसाठी योग्य शेतजमीन निवडणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीसाठी योग्य जमीन निवडली तर फक्त 70 दिवसात भरघोस नफा मिळवू शकतात.

Updated on 08 August, 2022 12:10 PM IST

मिरची लागवडीसाठी (Chili Cultivation) योग्य शेतजमीन निवडणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी (farmers) या पिकाच्या लागवडीसाठी योग्य जमीन निवडली तर फक्त 70 दिवसात भरघोस नफा मिळवू शकतात.

एका एकरात शेतकऱ्यांना 35 क्विंटलपर्यंत उत्पादन (product) मिळू शकते, ज्यातून 2 ते 3 लाखांचा नफा मिळू शकतो. देशातील अनेक राज्यांमध्ये मसाल्यांची लागवड (Cultivation of spices) मोठ्या प्रमाणात केली जाते. मिरची लागवडीमुळे कमी खर्चात भरघोस नफा मिळतो.

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये शेतकरी मिरचीची लागवड करून चांगले उत्पादन घेतात. तुम्हालाही मिरचीची लागवड करून चांगला नफा मिळवायचा असेल तर याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Strawberry Farming: 'या' फळाच्या लागवडीने बदलणार शेतकऱ्यांचे नशीब; जाणून घ्या सविस्तर माहिती

अशी शेती करा

सर्वप्रथम शेत तयार करण्यापूर्वी शेतात नांगरणी करा. शेतात तीन ते चार वेळा नांगरणी केल्यास खूप फायदा होतो. पेरणीपूर्वी 20 दिवस आधी शेतात चांगले खत (Fertilizer) टाकावे. त्यानंतर बिया पॉलिथिनमध्ये मातीच्या मध्यभागी बांधून ठेवाव्यात.

काही दिवसांतच त्यातून रोपे वाढू लागतील. नंतर ते शेतात लावा.शेतात तण वाढू नये याची काळजी घ्या. त्यासाठी वेळोवेळी शेताची साफसफाई करत रहा. याशिवाय झाडांना वेळोवेळी खत देत राहा, ते झाडांच्या पोषणासाठी खूप फायदेशीर आहे.

Agricultural Business: 'या' फुलांपासून बनतो चहा; शेती करून कमवा तिप्पट नफा

इतका नफा

जर शेतकऱ्याने मिरचीची लागवड चांगली केली तर त्याला नक्कीच नफा मिळेल. तज्ज्ञांच्या मते, एक एकर मिरची लागवडीसाठी सुमारे 20-30 हजार रुपये खर्च येतो. 70 दिवसात झाडांवर मिरची येते. मिरचीचे एका एकरात ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. यातून शेतकरी एका एकरात 2 ते 3 लाख रुपयांचा अंदाजे नफा आरामात मिळवू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
Goat Rearing: चांगला नफा मिळविण्यासाठी 'या' जातीच्या शेळीचे करा पालन; काही महिन्यातच व्हाल मालामाल
Planting Cloves: लवंग लागवडीतून मिळवा बंपर नफा; वर्षाकाठी शेतकरी कमवतोय 'इतके' उत्पन्न
Daily Horoscope : कसा जाईल 'या' आठवड्याचा पहिला दिवस? वाचा आजचे राशिभविष्य

English Summary: Agriculture Cultivation Farmers produce crops shortest duration
Published on: 08 August 2022, 12:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)