Agripedia

शेतकऱ्यांसाठी (farmers) बंपर फायदेशीर हे पीक ठरू शकते. या झाडाची लागवड करून शेतकरी 12 वर्षात करोडपती होऊ शकतो. तपकिरी लाकूड असलेल्या या झाडाला पाण्यामुळे इजा होत नाही.

Updated on 17 August, 2022 4:14 PM IST

महोगनी लागवड शेतकऱ्यांसाठी (farmers) फायदेशीर पीक ठरू शकते. या झाडाची लागवड करून शेतकरी 12 वर्षात करोडपती होऊ शकतो. तपकिरी लाकूड असलेल्या या झाडाला पाण्यामुळे इजा होत नाही. त्याची कातडी, लाकूड आणि पानेही बाजारात चांगल्या किमतीत विकली जातात. ज्याद्वारे शेतकरी चांगला नफा कमवू शकतो

या झाडाच्या वाढीसाठी सुपीक माती, चांगला निचरा आणि सामान्य पीएच योग्य आहे. लाकडाच्या ताकदीमुळे जहाजे, दागदागिने, फर्निचर, प्लायवूड, सजावट आणि शिल्पे बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो, जो लवकर खराब होत नाही आणि अनेक वर्षे टिकतो.

महोगनी वनस्पती अशा ठिकाणी लावू नका, जेथे वाऱ्याचा प्रवाह (wind current)जोरदार असेल, त्याची झाडे या ठिकाणी उगवत नाहीत. यामुळेच डोंगरावर लागवड न करण्याचा सल्ला दिला जातो.

Multi Layer Farming: शेतकरी मित्रांनो मल्टी लेयर फार्मिंगमधून घ्या लाखोंची कमाई; व्हाल मालामाल

या झाडाजवळ डास येत नाहीत

महोगनीच्या झाडांजवळ डास आणि कीटक येत नाहीत. यामुळेच याच्या पानांचे आणि बियांचे तेल (Seed oil) डासांपासून बचाव करणारे पदार्थ आणि कीटकनाशके बनवण्यासाठी वापरले जाते. त्याचे तेल साबण, रंग, वार्निश आणि अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी वापरले जाते. त्याची साल आणि पाने अनेक रोगांवर देखील वापरली जातात.

Eknath Shinde: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिला शब्द; म्हणाले...

महोगनी शेतीतून कमाई

महोगनी झाडे 12 वर्षांत लाकूड कापणीसाठी तयार आहेत. त्याचे बियाणे एक हजार रुपये किलोपर्यंत बाजारात विकले जाते. त्याच वेळी, त्याचे लाकूड 2000 ते 2200 रुपये प्रति घनफूटपर्यंत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

ही एक औषधी वनस्पती (Medicinal plants) देखील आहे, म्हणून तिच्या बिया आणि फुलांचा वापर अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत शेतकरी याच्या लागवडीतून करोडोंचा नफा कमवू शकतात.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो 'या' बियांची लागवड करून व्हा श्रीमंत; फक्त तीन महिन्यांत ६ लाखांपर्यंत मिळतोय नफा
Organic Farming: सेंद्रिय भाजीपाला महाग का होतोय? कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल
Fertilizers: शेतकरी मित्रांनो सावधान! खतांच्या अतिवापरामुळे पिकांचे होतेय मोठे नुकसान

English Summary: Agricultural Business Farming tree very profitabl millionaire within few years
Published on: 12 August 2022, 11:51 IST