जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा गोगलगायीद्वारे अंडी टाकण्याचा राहणार आहे. जुलै महिन्याचा पहिला पंधरवाडा गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी निर्णायक राहणार आहे. त्यामुळे पहिल्या पंधरवाड्यातच सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरूपात गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभाग व कृषि विद्यापीठाने केले आहे.
सर्वसाधारण गोगलगायी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमिनीखाली सुप्तावस्थेत जातात आणि जून महिन्यात चांगला पाऊस होताच त्या सुप्तावस्थेतून बाहेर येऊन जमिनीच्यावर येतात. मागीलवर्षी सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या पावसानंतर सुप्तावस्था संपवून जमिनीच्या वर आलेल्या आहेत.
गोगलगायी वाढण्याचा हंगाम
सध्या मागीलवर्षी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे दुबार पेरणी कराव्या लागलेल्या क्षेत्रामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे. सुप्तावस्था संपवून जमिनीवर आलेल्या गोगलगायी पहिल्या पंधरा दिवसात समान आकाराच्या गोगलगायीशी संग करून पंधरा दिवसानंतर जमिनीच्याखाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकणार आहे.
या अंड्याद्वारे गोगलगायीची पुढील वर्षाची पिढी तयार होणार आहे. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायीचे नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाबरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, असे सोयाबीन अभ्यासक डॉ. अरुण गुट्टे यांनी सांगितले.
टोमॅटोनं सगळ्यांचंच मन जिंकलं! नारायणगाव बाजार समितीतील टोमॅटोत अवतरले "गणपती बाप्पा"
गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन
गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोपावस्थेत मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे रोपावस्थापूर्वीच गोगलगायीचे नियंत्रण करणे आवशयक आहे. सध्या सुप्तावस्थेतून बाहेर आलेल्या गोगलगायी दररोज सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान बांधाच्या बाजूने आढळून येत आहेत.
त्यामुळे गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान शेतात जाऊन जमिनीच्या वर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायी कुठेही न टाकून देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात किंवा गोळा केलेल्या गोगलगायींवर मीठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी, असा सल्ला डॉ. गुट्टे यांनी दिला आहे.
अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला! असा ठरला फॉर्म्युला...
असं करा गोगलगायींचं नियंत्रण
सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजूने रॅन्डम पद्धतीने टाकावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आहे, असेही डॉक्टर सांगतात.
Share your comments