आपल्याला माहिती आहेच की पारंपरिक पद्धतीमध्येखवा बनवण्यासाठी सातत्याने उष्णते समोर बसून ते हलवत राहावे लागते. या उष्णता ऊर्जा वाया जाणे सोबत वेळही अधिक लागतो.त्या तुलनेमध्ये कमीऊर्जेमध्ये खवा बनवण्याची सुधारित यंत्रे आता उपलब्ध झाली आहे.
त्यांचा वापर केल्यामुळे उच्च प्रतीचा खवा मिळवता येतो. दुधातील पाण्याचे प्रमाण कढईत बाष्पीभवन करून एकजनसीस्थायूदुग्ध पदार्थ म्हणजे खवा होय.या लेखात आपण खवा बनवण्याची सुधारितबॅचपद्धत जाणून घेणार आहोत.
खवा बनवण्याची सुधारित बॅच पद्धत
स्टेनलेस स्टील डबल जॅकेटेड- या पद्धतीमध्ये खावा बनवण्यासाठी गरम वाफेचा व स्टेनलेस स्टील डबल जॅकेटेड उपकरणांचा वापर केला जातो.
- या पद्धतीने जर खवा तयार केला तर त्याला धुराचा वास किंवा जळालेला वास येत नाही. खवा हा एक जीव,उच्च प्रतीचा व पांढर्या रंगाचा बनतो. सुधारीत बॅच पद्धती खवा बनवण्याची पारंपारिक पद्धती सारखेच आहे.मात्र यामध्ये उष्णता देण्यासाठी वाफेचा वापर केला जातो.
- खवा पॅन- छोट्या उद्योजकांना करिता संशोधकांनी खवा पॅन बनवला आहे.
- हा खवा पॅनचुलीवर किंवा भट्टीवर लाकडाच्या सहाय्याने गरम करावा लागतो.त्यानंतर तव्या मधील पाणी गरम होऊन त्याची वाफ बनते. दुसऱ्या बाजूस असलेल्या दुधाला सतत उकळण्याचे कार्य करते. त्यापासून खवा बनतो. या खवा पॅनच्या वापराने सुमारे आठ मिनिटात अडीच लिटर दुधापासून 0.6किलोउच्च प्रतीचा खावा मिळतो.
( संदर्भ- ॲग्रोवन)
Share your comments