कांदा हे भारतातील प्रमुख पीक असून ते मुख्यत्वे खरीप व रब्बी हंगामात पिकविले जाते आपल्या भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण हे 6 टक्के आहे. कांद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कांदा हा नाशवंत पदार्थ आहे. तसेच त्याच्यातील तिखटपणा, अधिक प्रमाणात असलेल्या एंटीऑक्सीडेंट त्यामुळे भारतीय कांद्याचे पोषण मूल्य अधिक आहेत. कांदा हा विविध पदार्थांमध्ये आणि विशेषतः औषधी गुणधर्मासाठी उपयोगी आहे. तसेच कांद्या मधील घटक हे मोतीबिंदू मुळव्याध, मूत्राशय, कर्करोग, हृदय रक्तवाहिन्या संदर्भातील आजारांसाठी उपयुक्त आहेत
अशा उपयुक्त कांद्याचे मूल्यवर्धन हे सोलर ड्रॉईंग, व्याक्युम मायक्रोवेव ड्रॉईंग, इत्यादी तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून केले जाते. आपण पाहतो कांद्याचे दर हे बऱ्याच वेळेस फार प्रमाणात खाली येतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये न देता त्याच्यावर प्रक्रिया केली तर अशा मूल्यवर्धन केलेल्या कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व आहे. कांद्याचे निर्जलीकरण करून विविध पदार्थ तयार करता येतात. जसे कांद्याचा चक्त्या, कांदा ग्रेव्ही, कांदा पावडर यासारखे पदार्थ तयार करता येतात. या लेखात आपण कांद्यापासून प्रक्रिया करून तयार केले जाणारे पदार्थांची माहिती घेऊ.
कांदा निर्जलीकरण
या प्रक्रियेदरम्यान कांद्यातील मुक्त पाणी बाष्पाच्या स्वरूपात काढले जाते. कांद्यांचे सूक्ष्मजीव आणि पासून संरक्षण व्हावे यासाठी प्रक्रिया केली जाते. निर्जलीकरण केलेले कांदे हे हवाबंद डबे मध्ये पॅक करून निर्यात केले जातात. योग्य वेस्टन व साठवणूक तापमान असल्यास 7 ते 12 महिने हे कांदे टिकतात.
कांदा निर्जलीकरण विषयी महत्वाचे मुद्दे
- निर्जलीकरण कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. निर्जलीकरण करण्यासाठी शक्यतो पांढरा व अधिक टीएसएस असलेला कांदा वापरला जातो.
- कांदा निर्जलीकरण यासाठी कांद्याचा शेंडा व टोकाकडे भाग कापून साल काढून चार ते आठ मी. मी जाडीच्या चकत्या करतात
- या कापलेल्या चकत्या मिठाच्या द्रावणात दोन तास भिजत ठेवून 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या फ्लू डाएज्ड बॅड ड्रायरमध्ये अकरा ते तेरा तासांसाठी ठेवतात या तापमानाला कांद्यातील आंबलं व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्मजीव आणि पासून संरक्षण केले जाते.
- प्रक्रियायुक्त मालाचा उच्च दर्जा टिकविण्यासाठी तो हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक करतात.
- कांदा निर्जलीकरण केल्यास अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामध्ये प्रामुख्याने सुकविलेल्या कांद्याचा वाहतूक खर्च तुलनेने कमी येतो. तसेच निर्जलीकरण केलेल्या कांद्याचे नुकसान होत नाही. परदेशांमध्ये कांदा चकत्या व पावडर यांचा उपयोग मासाच्या हवाबंद पदार्थांमध्ये, सॊस, चिली या सारख्या पदार्थांमध्ये करतात
कांदा ग्रेव्ही
कांदा ग्रेव्ही साठी लागणारे साहित्य
एक किलो कांदे, काळीमिरी पाच ग्रॅम, लवंग पाच ग्रॅम, दालचिनी पाच ग्रॅम, तेज पत्ता दहा ग्रॅम, तेल 50 ग्रॅम, पाणी साडेसातशे ग्रॅम
बनवण्याची प्रक्रिया
- सपाट तवा किंवा कढईत कांद्याचे काप करून भाजून घ्यावेत.
- भाजलेल्या कांद्याची ग्राइंडर मध्ये पेस्ट बनवावी.
- कढईत तेल तापवून त्यात काळीमिरी, लवंग, दालचिनी आणि त्याची फक्त टाकावा आणि त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्यावी.
- या तयार ग्रेव्हीमध्ये साडेसातशे मिलि पाणी मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटे साठी संथ अग्नीवर उकळून घ्यावे.
- गरम ग्रेव्ही एक किलो किंवा पाच किलोच्या साईज मध्ये पॅक करावे.
- ग्रेव्हीला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाबे या ठिकाणी प्रचंड मागणी आहे.
वाळलेला कांदा/ पावडर
प्रक्रिया
- कांद्याचे सुमारे पाच ते सहा मिलिमीटर जाडीचे काप करावे.
- काप केलेले कांदे ट्रे ड्रायरमध्ये 55 अंश सेल्सिअस तापमानाला 14 तासापर्यंत वाळवावा.
- अशा प्रकारे निर्जलीकरण केलेल्या कांद्याला अधिक काळ टिकवता येते.
- वाळवलेल्या कांद्याची ग्राइंडर च्या सहाय्याने पावडर करावी.
- या पावडर ला चाळणीने गाळून हवाबंद पॅकेट्स मध्ये पॅक करावे.
- कांदा पावडर मुळे शेतकऱ्यांना खूप नफा मिळवणे शक्य होते.
तेल
कांद्यापासून तेल सुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही त्याचा वापर केला जातो.
सिरका / वाईन
कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून विनेगर आणि वाईन आदींची निर्मिती करता येते.
कांद्याच्या टाकाऊ भागावरील प्रक्रिया
- कांद्याच्या घरगुती आणि औद्योगिक वापरातून उरलेला कचरा देखील प्रक्रिया करून वापरता येऊ शकते.
- कांदा सालीतून रंग मिळवता येतात. ते नैसर्गिक रंग म्हणून वापरले जातात तसेच रंग काढून उरलेला भाग फायबर चा चांगला स्रोत आहे.
- कांद्याच्या कोरड्या सालीमध्ये फ्लेवनोड्स घटक असतात. त्यापासून स्वाद आणणारे घटक तयार करता येतात. कांद्याच्या बाहेरील थर आणि पात्यांच्या बायोगॅस मध्ये पर्यायी ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्यासाठी उपयोग करता येतो.
Share your comments