शेतकरी आपल्या शेतीमध्ये आपल्या कल्पनेने नवनवीन पिके (crops) घेऊन चांगले उत्पादन काढत असतात. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे गटशेतीतून बटाट्याचे उत्पादन घेतले आहे.
गटशेती ही सातारा जिल्ह्यातील माणच्या पश्चिम भागातील डोंगरावरील बोथे व श्रीपालवण या गावातील युवा शेतकऱ्यांनी बटाट्याची शेती करून क्रांती घडविली आहे. तब्बल 29 एकरामध्ये लाल व काळ्या मातीत 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन घेतले.
बोथे व श्रीपालवण या गावातील तरुणांनी बटाट्याचे उत्पादन घेऊन वेगळी ओळख निर्माण केलीय. इतर शेतकऱ्यांसारखा त्यांनाही हवामान बदलामुळे उत्पादनात फटका सहन करावा लागला. यावर मात करण्यासाठी एकजुटीने बोथे येथील युवा शेतकरी गटशेतीकडे (Group farming) वळले.
त्यांनी माणदेश एग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी काढली. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बटाटा उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी युवकांनी बटाट्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन (Produced organically) कसे घ्यायचे याचे कृषीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले.
प्रगतशील शेतकर्यांच्या शेतीस भेटी दिल्या. सर्व शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून सेंद्रिय बटाट्याची माहिती घेतली. पाणी फाऊंडेशन टीम व कृषी अधिकार्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ते या शेतीकडे वळले. आज ते लाखोंमध्ये उत्पन्न घेत आहेत.
शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली
लागवडीसाठी बियाणे, सेंद्रिय खते, औषधे यांची एकत्रित व एकमताने निवड केली. गटशेती यामुळे खर्चात बचत झाली. आधुनिक तंत्रज्ञान व पारंपरिक शेतीची सांगड घालून उत्पादन घेतले. यात बीज प्रक्रिया, उगवण क्षमता, दशपर्णी अर्क, जीवामृत इ गोष्टींचा योग्य वापर केला.
विशेष म्हणजे कोणतेही रासायनिक खत (Chemical fertilizers) वापरले नाही. पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीनंतर राज्य शासनाकडून या बटाट्यास विषमुक्त असल्याचे 'सेंद्रिय प्रमाणित प्रमाणपत्र' मिळाले आहे.
Share your comments