पेरूला गरीब माणसाचे सफरचंद असे म्हटले जाते. पेरू फळांमध्ये क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. या फळात आवळ्याच्या खालोखाल लिंबा पेक्षा ही जवळपास चार पट जास्त क जीवनसत्त्व आढळते.त्यामुळे हिरड्या बळकट होण्यास मदत होते. पेरू मुळे चांगली भूक लागते तसेच जेवणानंतर पेरू खाल्ल्याने पचन सुलभ होते. पेरू फळातील कॅल्शियम मुळे दात व हाडे मजबूत होतात. पेरू फळांमध्ये सायट्रिक ऍसिड चे प्रमाण मुबलक असते.
पेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे जास्त दिवस टिकत नाही.फळांची विक्री लवकर न झाले असे फळ खराब होते व त्याचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून सध्या पेरुच्या फळांवरील रिक्त पेरू पासून बनवलेल्या विविध पदार्थांना बाजारामध्ये चांगली मागणी असते. या पार्श्वभूमीवर पेरू उत्पादकांसाठी पेरू प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची चांगली संधी आहे. पेरू पासून टॉफी, जॅम,जेली, गर, सरबत, नेक्टर, स्क्वॅश या विविध प्रक्रियायुक्त पदार्थातून निश्चित जास्त नफा मिळवता येऊ शकतो. या लेखात आपण पेरूवर प्रक्रिया करून बनणाऱ्या विविध पदार्थांची माहिती घेऊ.
पेरूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
- पेरू जेली- पेरू जेली तयार करण्यासाठी पेक्टीन अत्यावश्यक घटक असून कच्चा ते मध्यम पिकलेल्या फळांमध्ये या घटकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जेली तयार करण्यासाठी मदत होते. त्यासाठी
- प्रथम फळे घेऊन ती स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी. फळाचे बारीक काप करून त्यामध्ये त्याच्या वजनाच्या दीडपट पाणी टाकून मिश्रण गाळून घेऊन गाळलेल्या द्रावणाचा वापर जेली तयार करण्यासाठी करावा.
- सदर द्रावण स्टीलच्या पातेल्यात घेऊन त्यात साखर टाकून गॅसच्या मंद आचेवर शिजवावे. त्यामधील साखर ( 650 ग्रॅम प्रति एक किलो ग्रॅमद्रावणास ) पूर्ण विरघळून घ्यावी.
- त्यानंतर मिश्रणात एक टक्के सायट्रिक ऍसिड मिसळावे. जेली तयार झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्याचा ब्रिक्स पासष्ट आला की नाही हे पाहावे.
पेरू सरबत
पेरू सरबत तयार करण्यासाठी कमीत कमी दहा टक्के रस, पंधरा टक्के साखर व आम्लता 0.2-0.4 टक्के ठेवावी या प्रमाणानुसार आपण जर एक किलो रस घेतल्यास त्या मध्ये 1 हजार 400 ग्रॅम साखर,7.5लिटर पाणी व दोन ग्रॅम सायट्रिक ऍसिड टाकावे. सदर प्रमाणानुसार दहा लिटर सरबत तयार होऊ शकते.प्रथम वरील प्रमाणानुसार रस घ्यावा. त्यामध्ये साखर, पाणी व सायट्रिक ॲसिड टाकून 80 ते 85 सेंटीग्रेड तापमानास दहा ते पंधरा मिनिटे उकळून घेऊन ते सरबत गाळून घ्यावे.नंतर तयार झालेले सरबत निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये हवाबंद करून ठेवा.
पेरू सिरप
पेरू सिरप तयार करण्यासाठी पिकलेले फळ घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन ती कापून त्यापासून गर तयार करावा. सिरप तयार करताना प्रथम गराचा ब्रिक्स 20-22°आहे का ते बघून घ्यावे. त्यामध्ये मूळ रसाचे प्रमाण 35 टक्के ठेवून साखरेचे प्रमाण 65 टक्के व आम्लता 1.2 टक्के ठेवावी. एक किलो गर असेल तर त्यामध्ये एक हजार 500 ग्राम साखर व 69 ग्राम सायट्रिक ऍसिड टाका. नंतर सर्वसाधारण 80 ते 85 सेंटीग्रेड तापमानास दहा ते पंधरा मिनिटे उकळून घेऊन देशी रम निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये हवाबंद करून ठेवावे.
पेरू टॉफी
पिकलेली फळे घेऊन त्यापासून गर तयार करावा. टॉफी तयार करण्यासाठी पल्प एक किलो साखर चारशे पन्नास ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज80 ग्रॅम, दूध पावडर साठ ग्राम,सायट्रिक ऍसिड दोन ग्रॅम वनस्पती तूप शंभर ग्रॅम या प्रमाणात वापरावे. टॉफी तयार करण्यासाठी अगोदर गर भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये वनस्पती तूप मिसळून गर गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा.
घेतलेल्या प्रमाणानुसार साखर,दूध पावडर, सायट्रिक ऍसिड हे घटक टाकून मिश्रण एकजीव करावे. मंद आचेवर मिश्रण चांगले ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज टाकून मिश्रणाचा ब्रिक्स 70 ते 72 दरम्यान आल्यावर गॅस बंद करून मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे आपल्या गरजेनुसार काप करावे व तयार टॉफी बटर पेपर मध्ये किंवा टॉपी रॅपरमध्येटेक करावी.
पेरूचा गर
पेरू फळाच्या हंगामात यापासून गर तयार करून तो हवाबंद कॅन किंवा बॉटल मध्ये दीर्घ काळ साठवून ठेवता येतो व फळांचा हंगाम नसताना त्याचा वापर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी होऊ शकतो.यासाठी प्रथम पेरू पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत व त्याच्या फोडी कराव्यात. त्यानंतर स्क्रू टाइप पल्पर मध्ये पेरूच्या फोडी टाकून गर वेळा केला जातो. पेरूच्या गराचा ब्रिक्स 20-22° करून त्याची आम्लता 0.5 ठेवावी. गरचांगला टिकवण्यासाठी पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट चावापर करावा किंवा गर भरून ठेवलेल्या बाटल्या 80 ते 85 सेंटीग्रेड तापमानास 10 ते 15 मिनिटे गरम पाण्यात ठेवावे.
Share your comments