केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. आता सरकार शेतकऱ्यांना बोन्साय वनस्पती लागवडीसाठीही आर्थिक मदत करत आहे.
आजकाल बोन्साय वनस्पती (Bonsai plants) शुभ मानली जाते. या वनस्पतीमधून शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात. बोन्सायची लागवड कशी करू शकता आणि यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल? आणि यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत किती केली जाते? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
बोन्साय कहा वापर आजकाल घर आणि ऑफिसमध्ये (office) सजावटीसाठीही केला जात आहे. त्यामुळेच त्याची मागणीही मोठी आहे. बाजारात त्याची किंमत 200 ते 2500 रुपयांपर्यंत असू शकते. बोन्साय वनस्पती प्रेमीं तोंडी किंमत मोजायला तयार असतात.
कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव
कमी भांडवलात हे काम सुरू करता येते. मात्र, बोन्साय प्लांट तयार होण्यासाठी 2 ते 5 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे यामध्ये नफा मिळण्यास कालावधी लागतो. याशिवाय रोपवाटिकेतून तयार रोपे आणून तुम्ही ३० ते ५० टक्के अधिक किमतीत विकू शकता.
LIC च्या सरल पेन्शन योजनेत मिळणार पाहिजे तेवढी पेन्शन; फक्त 'हे' एकच काम करावे लागणार
घरबसल्या करा व्यवसाय
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला पाणी, वालुकामय माती, भांडे आणि काचेचे भांडे, जमीन (land) किंवा छप्पर (100 ते 150 चौरस फूट), पातळ वायर, झाडांवर पाणी फवारण्यासाठी स्प्रे बाटली आणि शेड बनवण्यासाठी जाळी लागेल.
जर तुम्ही हा व्यवसाय (buisness) छोट्या प्रमाणावर केला तर तुम्हाला ५ हजार रुपये गुंतवावे लागतील. थोडे मोठे काम करण्यासाठी 20 ते 25 हजार लागतील. बोन्साय प्लांट तयार करण्यासाठी तीन वर्षांत सरासरी 240 रुपये खर्च येईल. यामध्ये सरकारकडून प्रति रोप 120 रुपये मदत केली जाणार आहे.
बोन्सायच्या (bonsai) गरजेनुसार आणि प्रजातींनुसार तुम्ही एक हेक्टरमध्ये 1500 ते 2500 झाडे लावू शकता. यासह, तुम्हाला 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न सहज मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या
शेतकरी मित्रांनो 'या' गाईचे करा पालन; दिवसाला देते 12 लिटरपेक्षा जास्त दूध
मान्सूनचा कहर! पुढील 3 ते 4 दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता
लेसर लेव्हलिंग, सरी वरंबा पद्धतींमुळे बाजरी उत्पादनात भरभराटी; जाणून घ्या प्रक्रिया
Published on: 14 September 2022, 03:43 IST