Weather

Weather Update: देशात सर्वदूर मान्सून सक्रिय झाला आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात शेती क्षेत्राला अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. अजूनही महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असल्याचे दिसत आहे. येत्या ४ दिवसात आणखी वरुणराजाचा कहर पाहायला मिळणार अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Updated on 30 July, 2022 9:58 AM IST

Weather Update: देशात सर्वदूर मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) शेती क्षेत्राला अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. अजूनही महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असल्याचे दिसत आहे. येत्या ४ दिवसात आणखी वरुणराजाचा कहर पाहायला मिळणार अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान खात्यानुसार, आजपासून पुढील चार दिवस उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. यादरम्यान या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गडगडाट होण्याचीही शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आजही पावसाचा अंदाज आहे.

याआधी शुक्रवारीही दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात पाऊस झाला. त्यामुळे तापमानात घट झाली असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने (Weather Department) मुंबईसह महाराष्ट्रातील इतर अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार, मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात आज वादळी वारे वाहू शकतात.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात दरवळेल पैशांचा सुगंध! वेलची लागवड करा आणि लाखो कमवा
पेट्रोल डिझेलचे दर जाहीर! पेट्रोल 84.10 रुपये तर डिझेल 79.74 रुपये प्रतिलिटर

यासोबतच आज तेलंगणा आणि लगतच्या राज्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवस हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागातही पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात दरवळेल पैशांचा सुगंध! वेलची लागवड करा आणि लाखो कमवा

त्याचवेळी, स्कायमेट वेदर या खाजगी हवामान अंदाज संस्थेनुसार, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणाचा काही भाग आणि मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा आणि अंदमानमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, ओडिशा, पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ, कर्नाटक आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:
भावांनो 'या' मशरूमची लागवड करून व्हाल लखपती! बाजारात असते बाराही महिने मागणी
आता माणसाच्या मूत्रावर चालणार ट्रॅक्टर! अमेरिकन कंपनीने केली देशात क्रांती

English Summary: rain will fall in these states for the next 4 days
Published on: 30 July 2022, 09:23 IST