Mansoon 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील तमाम जनतेला मान्सूनचे (Mansoon) वेध लागले आहे. शेतकरी बांधव (Farmer) तर मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, यावर्षी मान्सून (Mansoon 2022) हा केरळ मध्ये 29 मे ला दाखल झाला होता.
खरं पाहता मान्सून (Mansoon Rain) हा 1 जूनला केरळ मध्ये दाखल होत असतो मात्र यावर्षी मान्सून हा वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला. यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सून हा वेळेआधी दाखल होईल असा भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज होता.
शेतकरी बांधव देखील याबाबत शास्वत होते. मात्र मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्याने वेळेआधी तर सोडाच पण नेहमी ज्या वेळेत दाखल होतो त्या वेळेत देखील यंदा मान्सून राज्यात दाखल झाला नाही. मान्सून दरवर्षी 7 जूनला महाराष्ट्रातील तळकोकणात येत असतो आणि मग तेथुन पुढे मान्सूनचा प्रवास हा संपूर्ण राज्यात सुरु होतो.
मात्र या वर्षी मान्सून 7 जूनला दाखल झाला नाही. आता भारतीय हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, येत्या 2 दिवसात मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. म्हणजेचं आगामी दोन दिवसात मान्सून हा महाराष्ट्रातील तळकोकणात बघायला मिळू शकतो.
यामुळे निश्चितच चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळतं आहे. शिवाय आता शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील पेरण्याचे नियोजन देखील करता येणार आहे. एवढेच नाही तर उकाड्यामुळे हैराण झालेल्या जनतेस देखील यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसळीकर यांनी राज्यातील मान्सून आगमनाबाबत काही महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यांच्या मते, पुढील 48 तासांत, मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक आणखी काही भाग, तेलंगणाचा उरलेला भाग, दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भाग, WC & NW BoB च्या आणखी काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे.
शिवाय त्यापुढील 2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे. पुणे वेधशाळेच्या प्रमुखांनी दिलेल्या या माहितीमुळे आता मान्सून दोन दिवसात राज्यात दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Published on: 09 June 2022, 05:19 IST