Weather

Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस ओसरला आहे. मात्र सध्या जरी पाऊस ओसरला असला तरी गणेश चतुर्थीपासून 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अगोदर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.

Updated on 30 August, 2022 9:53 AM IST

Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस (Heavy Rain) ओसरला आहे. मात्र सध्या जरी पाऊस ओसरला असला तरी गणेश चतुर्थीपासून 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) अगोदर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.

या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता हवामान विभागाने (Department of Meteorology) पुन्हा एकदा पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या भागांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

काही भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतपिके जळून चालली आहेत. मात्र शेतकऱ्यांना गणपतीच्या दिवसांत पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. या दिवसांतही पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.

मोठी बातमी! कांदा 400 रुपये आणि टोमॅटो 500 रुपये किलो

या आठवड्यातही पावसाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्राच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी हवामान खात्याकडून सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

धक्कादायक! मंत्रालयाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

यानंतर गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर शुक्रवार आणि शनिवारीही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी रविवारीही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. दुसरीकडे, राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:
Gold Price: आजच खरेदी करा सोने आणि चांदी! 10 ग्रॅम सोने खरेदीमागे वाचतील 4795 रुपये
गहू उत्पादकांचे येणार सुगीचे दिवस! हेक्टरी 82 क्विंटल उत्पादन देणारे गव्हाचे 3 वाण विकसित

English Summary: Maharashtra Weather: Heavy rain alert in 18 districts of the state
Published on: 30 August 2022, 09:53 IST